📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य

Table of Contents

▪मेष : जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. भागिदारीतून चांगला लाभ संभवतो. व्यापार विस्ताराचा विचार कराल. आपले महत्व इतरांना पट‍वून द्याल.
▪वृषभ : आर्थिक दर्जा सुधारण्याचा प्रयत्न कराल. स्त्रीवर्गाशी मैत्री कराल. तुमच्यातील शालीनता दिसून येईल. चारचौघात तुमचे कौतुक होईल.
▪मिथुन : सजावटीच्या वस्तु खरेदी कराल. सहृदयतेने वागणे ठेवाल. मित्रांच्या ओळखीने कामे केली जातील. बोलण्यातून इतरांची मने जिंकून घ्याल.
▪कर्क : वाचनाची आवड जोपासाल. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. कलेला पोषक वातावरण मिळेल. मुलांकडून आनंदाच्या बातम्या मिळतील.
▪सिंह : सासुरवाडीची मदत मिळेल. काही कामे कमी श्रमात पार पडतील. मित्रमंडळी जमवाल. रेस, सट्टा यांतून लाभ होईल.
▪कन्या : उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. आवडी-निवडी वर भर द्याल. एकमेकांची बाजू उत्तमरीत्या समजून घ्याल. पत्नीच्या शांत स्वभावाची जाणीव होईल.
▪तूळ : व्यसनाच्या आहारी जाऊ नका. आळशीपणा करू नका. हाताखालील नोकरांचे सहकार्य लाभेल. ऐषारामाच्या गोष्टींची आवड निर्माण होईल.
▪वृश्चिक : हातून चांगले लिखाण होईल. मनमोकळ्या गप्पा मारता येतील. मित्र परिवारात भर पडेल. आधुनिक विचार मांडाल.
▪धनू : उत्तम वाहन सौख्य लाभेल. नवीन वाहन खरेदीचा विचार कराल. मदत करण्याचा आनंद कमवाल. घरात टापटीपपणा ठेवाल.
▪मकर : चांगली कल्पनाशक्ति लाभेल. इतरांच्या आनंदात आनंद मानाल. निसर्गाच्या सहवासात रमून जाल. प्रवासाची हौस पूर्ण करता येईल.
▪कुंभ : आवडत्या वस्तु खरेदी कराल. एकलकोंडेपणा बाजूला ठेवावा. गुरूजनांचा सहवास लाभेल. गप्पा-गोष्टींमध्ये वेळ जाईल.
▪मीन : उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. चैनीकडे कल राहील. अचानक धनलाभ संभवतो. सर्वांशी आपलेपणाने वागाल.

from https://ift.tt/whqJzLG

Leave a Comment

error: Content is protected !!