▪मेष – आजचा दिवस आर्थिक फायद्याचा दिवस आहे. आरोग्य सांभाळा. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. ओळखीच्या लोकांची नव्याने ओळख होईल.
▪वृषभ – घरासाठी आवश्यक असलेल्या सामानाची खरेदी कराल. मानसिक शांतता लाभेल. विचार सकात्मक ठेवा. कोणालाही वचन देताना विचार करा.
▪मिथुन – आजची सकाळ आपल्यासाठी शुभदायक असेल. दिवसभरात केलेला प्रवास खर्चिक होऊ शकतो. आईवडिलांना खूश करण्यासाठी प्रयत्न कराल. आवडती फुले घरातील फुलदाणीत ठेवा.
▪कर्क – मनाजोगती खरेदी कराल. अडचणींचा धैर्याने सामना कराल. गरजवंताला मदत करण्याच्या आपल्या सवयीचे कौतुक होईल.
▪सिंह – ब्युटिपार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ काढाल. दान-धर्म करा. उत्साहात वाढ होईल. संवाद कौशल्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे. जवळचा प्रवास कार्यसाधक होईल.
▪कन्या – आजचा दिवस चांगला आहे. इतरांच्या कामात ढवळाढवळ करू नका. समाजात मान-सन्मान मिळेल. इतरांना उपदेश करणे टाळा. जुन्या गोष्टी विनाकारण उगाळत बसू नका.
▪तूळ – विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. चर्चासत्रात सहभागी होण्याची संधी मिळेल. खर्च कमी करा. मुलांसोबत करमणूक घडेल. मानसिक चिंता दूर ठेवा.
▪वृश्चिक – आर्थिक विवंचना दूर होतील.कोणाकडून सुधारण्याची अपेक्षा करू नका. भविष्यकाळाचा विचार करून गुंतवणूक करा. प्रिय व्यक्तिकडून शुभेच्छा मिळतील. विचारपूर्वक पाऊल टाका.
▪धनु – नकारात्मक विचार करणे टाळा. अडून राहिलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. मानसिकदृष्ट्या समाधानी राहाल. प्रकृती उत्तम राहील. आजचा दिवस धन लाभ होण्याचा आहे.
▪मकर – आजचा दिवस जोडीदारासोबत मनमोकळ्या गप्पा मारण्यात घालवाल. सण-समारंभ पारंपरिक पद्धतीने साजरे करण्याकडे कल असेल. कुटुंबियांसोबत करमणुकीचे कार्यक्रम पाहण्यासाठी जाल.
▪कुंभ – कामाच्या ठिकाणी नव्या ओळखी होण्याची शक्यता आहे. इतरांना उपदेश करणे टाळा. नेहमी घरी उशिरा जाणे टाळा. आहाराचे पथ्यपाणी सांभाळा.
▪मीन – कामात वरिष्ठ सहकार्य करतील. मित्रांना मदत कराल. दुखणे अंगावर काढू नका. नवीन व्यवसायाला सुरुवात कराल. खर्च जपून करा. स्वत:साठी वेळ काढाल.

from https://ift.tt/EfYz7o8

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *