
सध्याच्या तंत्रज्ञानाची गती पाहता कुठलीच गोष्ट अशक्य नाही, असे बोलले जाते. सध्या जगभरातच अशीच एक बातमी चर्चेत आहे. ही बातमी जाणून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसणार एवढं नक्की. आता अमेरिकन शास्त्रज्ञांनी बनवलेला जिवंत रोबो प्रजनन देखील करू शकणार आहे.
आफ्रिकन बेडकांच्या पेशींचा वापर करून वर्मोट युनिव्हर्सिटी, टफ्ट्स युनिवर्सिटी आणि हार्वर्ड युनिवर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी जगातला पहिला जिवंत आणि स्व:तावर उपचार करणारा रोबो तयार केलाय.
2020 साली जेनोबोट्स नावाचा छोट्या आकाराचा हा रोबो शास्त्रज्ञांनी तयार केला. जेनोबोट्स हा बायोलॉजिकल रोबोची अत्यंत सुधारित आवृत्ती आहे. बेडकाच्या पेशींपासून बनलेला हा रोबो स्वतःचं ‘शरीर’ तयार करू शकतो, स्वतःवर उपचार करू शकतो. तसेच तो नव्या जिवंत रोबोला जन्माला देखील घालू शकतो.
from https://ift.tt/3lP8s6b