
जर तुमची त्वचा काळी पडली असेल तर या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक घरगुती उपाय आहेत. चला, तर हे उपाय जाणून घेऊयात..
● दही : यामध्ये लॅक्टिक अॅसिड आणि व्हिटॅमिन-सी भरपूर प्रमाणात ब्लिचिंगचे गुणधर्म आहेत. यामुळे थेट चेहऱ्यावर दही लावा आणि 10 मिनिटांनंतर कोमट पाण्याने स्वच्छ करा. याने बराच फरक पडेल.
● काकडी : कोपर आणि गुडघ्यावर काकडी 15 मिनिटे घासून घ्या. किमान पाच मिनिटे असेच राहू द्या. यानंतर ते थंड पाण्याने धुवा. यामुळे कोपराचा काळेपणा दूर होईल.
● बटाटा : यामध्ये क्लीनिंग आणि ब्लिचिंग गुणधर्म असतात. यासाठी बटाटा कापून कोपर आणि गुडघ्यावर सुमारे 5 मिनिटे चोळा. हे दिवसातून दोनदा केल्याने कोपर आणि गुडघ्यांचा काळेपणा दूर होईल.
● हळद : दुधात थोडी हळद मिसळा. ही पेस्ट गुडघे आणि कोपरांवर लावा. आता काही वेळ मसाज केल्यानंतर त्वचा कोमट पाण्याने धुवा. या मिश्रणात मधही घालू शकता. याने काळेपणा कमी होण्यास मदत होईल.
Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे.
from https://ift.tt/3DvDohw