हिवरे बाजारमध्ये सभासदांना वाटला लाखोंचा बोनस !

Table of Contents

नगर :आदर्श गाव हिवरे बाजार येथील मुंबादेवी सहकारी दुध उत्पादक संस्थेतर्फे नुकतेच बोनस वाटप करण्यात आले. संस्थेला झालेल्या नफ्यातून सालाबादप्रमाणे १ रुपया ४० पैसे प्रतिलिटर प्रमाणे सभासदांना बोनसचे वाटप राज्याच्या आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार,कन्हैय्या उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक मच्छिंद्रशेठ लंके यांच्या हस्ते करण्यात आले.
कन्हैय्या अॅग्रोचे अध्यक्ष सुरेश पठारे, संचालक नितीन अडसूळ,अभय औटी, उद्योजक सुरेशशेठ पोळ, मुंबादेवी सहकारी दुध संस्थेचे उपाध्यक्ष बाबासाहेब गुंजाळ, विठ्ठल ठाणगे, सखाराम पादीर सर, रोहिदास पादीर, जालिंदर चत्तर, अर्जुन पवार, दामोधर ठाणगे यावेळी उपस्थित होते.
संस्थेचे सभासद रघुनाथ रंगनाथ बांगर यांनी वर्षभरात ६३ हजार ९०१ लिटर दुध घातले असून त्यांना ८९ हजार ८६८ रुपये बोनस मिळाला,माधव रंगनाथ बांगर यांना ७३ हजार ६५२ रुपये बोनस मिळाला व भानुदास धनराज पादीर यांना ७३ हजार ५२६ बोनस मिळाला. अनुक्रमे एक, दोन, तीन क्रमांकाचा बोनस वरील सभासदांना मिळाला असून बाकी सर्व सभासदांना त्यांनी वर्षभर घातलेल्या दुधाच्या प्रमाणात बोनस मिळाला. एकूण संस्थेचे १३० सभासद असून रक्कम रुपये एकूण बोनस वाटण्यात आला कार्यक्रमासाठी संस्थेचे दुध उत्पादक सभासद मोठ्या संख्येने हजर होते.
आपकी अपनी ऑनलाइन दुकान खोलना अब हो गया है बहुत ही आसान और सस्ता भी। 

सिर्फ़ ४९९ रुपए में आप अपने ख़्वाबोंको हक़ीक़त में बदल सकते हैं।

आज ही www.apptmart.com पे रेजिस्टर कीजिये और एक क़दम सफलता की ओर उठायिये।

अधिक जानकारी के लिए आज ही सम्पर्क करें +91 70286 32421
हिवरे बाजार विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून २५० सभासदांना १० टक्के प्रमाणे लाभांश वाटप करण्यात आले. संस्थेला गेल्या आर्थिक वर्षात १५,४५,१५०/- नफा झाला असून त्या नफ्यातून वाटप करण्यात आले. त्यासाठी सोसायटीचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

from Parner Darshan https://ift.tt/3GMZ2AF

Leave a Comment

error: Content is protected !!