
अनुतापाशिवाय सुधारणा होत नाही यावर कालच्या भागात आपण चिंतन केले.अनेकांना आपण चुकिचं वागतोय हेच पटत नाही. सांगायचा प्रयत्न केला तरी ते सांगणारालाच वेड्यात काढतात.काही केल्या त्यांना अनुताप होत नाही.एकनाथी भागवतात नाथ महाराज म्हणतात,
जंव हरी हदयीं कृपा न करी । तंव अनुताप नुपजे शरीरीं । त्याची पूर्ण कृपा ज्यावरी । तो विषयीकांकुरीं वीतरागी ॥७२॥
विवेकाविण वैराग्य उठी । तें अपायीं घाली कडेकपाटीं । कीं वैराग्यविण विवेक उठी । तो जन्मला पोटी नपुंसक ॥७३॥
विवेकाविण वैराग्य आंधळे । वैराग्याविण विवेक पांगुळें । हें एकएका अवेगळें । झाल्याविण नकळे परमार्थ ॥७४॥
अनुताप होणे हीच हरिकृपा आहे.अशी हरीकृपा झाली की मग विषयाचं बीजच नष्ट होतं.विवेकाशिवाय वैराग्य येतच नाही.त्याशिवाय आलेलं वैराग्य म्हणजे एखाद्याच्या पोटी नपुसक जन्मावा असं ते होईल,ज्याचेनी कुलक्षय होतो.तसं हे वैराग्य असेल.
विवेकाशिवाय आलेलं वैराग्य आंधळं,पांगळं असेल.ते अवेगळे म्हणजे विवेक आणि वैराग्य एक झाल्याशिवाय ती स्थिती प्राप्त होतच नाही असं नाथ महाराज म्हणतात.
सज्जनहो आपल्यात अनेकदा तात्विक प्रसंगाने वैराग्य निर्माण होतं पण ते अनुतापाशिवाय असते.त्यामुळे ते टिकत नाही.
रामकृष्णहरी
from https://ift.tt/3Gvtu1e