आजही स्वामी विवेकानंद यांचे विचार प्रत्येकाला प्रेरणा देऊन जातात, भारावून टाकतात. ज्याच्या मनात निराशेची पाल आली तर ते दूर करतात. असेच त्यांचे काही विचार आज जाणून घेऊयात…
● उठा, जागे व्हा. जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत थांबू नका!
● ध्येयासाठी जगणे, हे ध्येयासाठी मरण्यापेक्षा कठीण आहे.

● कार्यशक्ती आणि इच्छाशक्ती प्राप्त करा.
● खडतर परिश्रम करा. म्हणजे तुम्ही निश्‍चित ध्येयाप्रत पोचू शकाल.
● मी त्या देवाचा सेवक आहे, ज्याला अज्ञानी मनुष्य म्हणतात.
● शक्‍यतेची सीमा जाणून घेण्यासाठी अशक्‍यतेच्या पुढे निघून जायला हवे.
● सारी शक्ती तुमच्या आत दडलेली आहे. तुम्ही काहीही आणि सारे काही करू शकता.

● सामर्थ्य हे जीवन आहे. तर दुर्बलता म्हणजे मृत्यू.
● तुमच्या विचारांप्रमाणे तुम्ही घडता. तुम्ही जर स्वत:ला दुर्बळ समजलात तर दुर्बळ बनाल आणि सामर्थ्यशाली समजलात तर सामर्थ्यशाली बनाल.
● देवाला जर आपण आपल्या अंत:करणात आणि प्रत्येक जिवंत व्यक्तीत शोधू शकलो नाहीत, तर त्याला शोधायला जाणार कोठे?

● एक काम करत असताना एकच काम करा. आपले सर्वस्व त्यात अर्पण करा. इतर सारे काही विसरून जा.
● दिवसभरातून एकदा तरी स्वत:शी संवाद साधा. तसे केले नाहीत तर तुम्ही या जगातील एका चांगल्या व्यक्तीला भेटण्याची संधी गमवाल.

from https://ift.tt/32lfWau

By News

Leave a Reply

Your email address will not be published.