नगर :’स्नेहालय’ संस्था करीत असलेले कार्य लाख मोलाचे आणि जबाबदारीचे असून येथील कार्यकर्ते ते उत्कृष्ट रित्या पार पाडीत आहेत. स्नेहालय संस्थेस सहकार्य करण्यास आम्ही नेहमीच कट्टीबद्ध आहोत” असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या राणी ताई लंके यांनी केले.
तालुक्यातील इसळक (हिम्मतग्राम) येथील सभामंडपाचे उद्घाटन सौ. लंके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. इसळक येथील सभामंडप आमदार निलेश लंके यांच्या आमदार विकास निधीतून बांधण्यात आला आहे .
यावेळी निंबळक, इसळक येथील ग्रामपंचायत सरपंच अजय लामखडे व संजय गेरंगे तसेच जयराम खेडेकर, संदीप गेरंगे, ऋषी घोडके, पोपट खामकर, सोमनाथ खांदवे, भाऊराव गायकवाड, घनश्याम म्हस्के, रवी धनवटे, बापूसाहेब टांगळ आदी ग्राम पंचायत सदस्य व निलेश लंके यांचे अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
गेली १३ वर्ष स्नेहालय संचलित हिंमतग्राम प्रकल्प वंचित घटकांतील महिलांना समाजात मानाचे स्थान मिळावे या उद्देशासाठी कार्यरत आहे. त्यांना त्यांच्या परिस्थितीतून बाहेर काढून स्वतःच्या हक्काची जाणीव करून देऊन त्यांचे पुनर्वसन करणे हा महत्वाचा उद्देश आहे असे हिम्मतग्रामचे संचालक राजेंद्र कांबळे यांनी सांगितले.
स्नेहालय संस्थेचे संस्थापक डॉ.गिरीश कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना राणीताई लंके या निलेश लंके यांची सावली आहेत ज्यामुळे त्यांचे कार्य अधिक उत्तम रित्या पार पडते असे सांगितले. आ.निलेश लंके यांनी स्नेहालय मधील लाभार्थ्यांना केलेल्या सहयोगाबद्दल त्यांचे आभार देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले.
सभा मंडपाबद्दल अधिक माहिती देताना गिरीश कुलकर्णी म्हणाले कि, “निलेशजी लंके जेव्हा आमदार झाले आणि त्यांच्याकडे सभामंडपाविषयी पहिलाच प्रस्ताव मांडला त्यावेळी त्यांनी तो ताबडतोब मंजूर करून घेतला. तसेच स्नेहालय मधील लाभार्थ्यांसाठी वेळोवेळी आवश्यक भाजीपाला,फळे,खाऊ,धान्य आदी. वस्तूंचा पुरवठा निलेश लंके यांच्या मार्फत नेहमी केला जातो.
स्नेहालयाचे वरिष्ठ सहसंचालक अनिल गावडे यांनी, कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.सूत्रसंचालन संगिता सानप यांनी केले.आभार चंद्रकांत शेंबडे यांनी मानले.
स्नेहालय च्या साक्षी आणि परी यांनी स्वागतगीत सादर केले.
या कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक गिरीश कुलकर्णी, हिम्मतग्रामचे संचालक राजेंद्र कांबळे, स्नेहालयाचे वरिष्ठ संचालक अनिल गावडे, सहसंचालक हनिफ शेख,प्रविण मुत्याल, भरत कुलकर्णी, सचिन ढोरमले, प्रकल्प व्यवस्थापक आणि स्नेहालय कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी स्नेहालय ताज शेख,अशोक अकोलकर, सुनील मोरे,प्रवीण राठोड ,बेबी केंगार,सुजाता शेलार,मंगल आठवले, रमाकांत दोड्डी,कालिदास खेडकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.

from https://ift.tt/Ox0WqMm

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *