पारनेर : तालुका सैनिक सहकारी बँकेचे २००६ ते २०२१ पर्यंत असणारे संचालक मंडळ, मुख्यकार्यकारी अधिकारी व त्यास मदत करणारे अधिकारी कर्मचारी या आर्थिक नुकसानीस जबाबदार असल्याचा ठपका ठेवत दोषी आढळले असल्याचा चौकशी अहवाल नाशिक विभागीय सहनिबंधक राजेंद्र शाह यांनी सहकार आयुक्त अनिल कवडे यांना दिला आहे.
अधिकारी यांनी बँकेचे कर्ज वसूल करताना नियमबाह्य ओटीएस सवलत देणे,अपारदर्शक लिलाव प्रक्रिया राबवणे,अयोग्य दराने सर चार्ज आकारणे, न्यायालयीन खर्चासाठी अवाढव्य वकील फी बँकेत टाकणे,म्युच्युअल फंडात बेकायदेशीर गुंतवणूक करत लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान करणे, शासकीय रकमेचा अपहार करणाऱ्या कर्जत शाखाअधिकारी सदाशिव फरांडे यास निलंबित न करता त्याला पाठीशी घातल्याने संचालक मंडळावर ठपका ठेवण्यात आला आहे.
नियमबाह्य कार्यपध्दतीने नातेवाईकांची भरती करून सेवेत घेणे,बँकेवर आपलीच सत्ता कायम राहण्यासाठी नियमबाह्य नातेवाईकांना सभासद करणे,गुन्हे दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांना नियमबाह्य ॲडव्हान्स देणे,जादा अवास्तव वसुली खर्च टाकणे ,फर्निचर व शाखा नूतनीकरण खर्च करताना पारदर्शकपणे न करणे,कर्ज वाटप करताना कमी मूल्यांकन तारण घेऊन जादा रक्कम कर्ज वाटप करणे, अधिकारी यांनी बँक निधीचा दुरूपयोग करत व कर्जाची सुरक्षितता न पाहता कर्ज वाटप करत बँकेच्या हिताला बाधा आणली आहे. तसेच संचालकांनी बेजबाबदारीने , कर्तव्यात कुसुर करणे, निष्काळजीपणे कारभार करत बँकेचे आर्थिक नुकसान केले असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
पारनेर तालुका सैनिक सहकारी बॅंकेतील चेअरमन,संचालक, मुख्यकार्यकारी अधिकारी संजय कोरडे व संबंधित भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांनी बँकेत नियमबाह्य कामकाज करून,बँकेत भ्रष्टाचार केल्याची तक्रार जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्यासह सभासद कॅप्टन विठ्ठल वराळ, बाळासाहेब नरसाळे,विनायक गोस्वामी, मारुती पोटघन,विक्रमसिंह कळमकर यांनी केली होती. त्यामुळे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी तात्काळ दखल घेत नाशिक विभागीय सहनिबंधक राजेंद्र शाह यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे पत्र दिले होते.
त्या नुसार शाह यांनी व त्यांच्या पथकाने तपासणी केली असता सन २००६ ते २०२१ कालावधीतील संचालक मंडळ अनेक मुद्द्यावर दोषी आढळले आहे.
या अहवालात मुख्यकार्यकारी अधिकारी संजय कोरडे यांनी नियमबाह्य कामकाज केले आहे तर संचालक मंडळाने कर्तव्यात सतत हेतुपूर्वक कसूर, निष्काळजीपणा करत करोडो रुपयांचे बँकेचे नुकसान केले आहे. बँकेचे मुख्यकार्यकारी आधिकारी संजय कोरडे यांच्या सह शाखा व्यवस्थापकांनाही लेखापरीक्षण अहवालात दोषी ठरवण्यात आले आहे.
सैनिक बँकेतील घोटाळयाची विभागीय सहनिबंधक यांनी चौकशी केली असता जवळ जवळ पाच कोटी रक्कम तीन संचालक मंडळाकडून व मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडून वसूल पात्र निघणार आहे. पूर्ण सखोल लेखापरीक्षण केल्यास चाळीस कोटींपेक्षा जादा रक्कम वसूल पात्र निघणार आहे. त्यामुळे सभासदांना गेली २० वर्षांपासून लाभांश रक्कम वाटप न करता हडप केली आहे.
त्यामुळे त्वरित हे संचालक मंडळ बरखास्त करावे व प्रशासक मंडळ सहकार आयुक्तांनी नियुक्त करावे.
बाळासाहेब नरसाळे
विनायक गोस्वामी

from https://ift.tt/etyCKoV

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *