
पुणे : यंदाच्या सिझनमधील प्रसिध्द देवगड हापूसची आंब्याची पहिली पेटी नुकतीच पुण्यात दाखल झाली आहे. आंब्याचा हंगाम सुरू होण्यास अद्याप दोन- तीन महिने बाकी असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील कुंभारमाठ येथून हापूसची आंब्याची पेटी पुण्याला दाखल झाली आहे. प्रगतशील शेतकरी उत्तम फोंडेकर यांनी ही पहिली देवगड हापूसची पेटी पुण्याला पाठविली.
पाच-पाच डझनच्या दोन पेट्यांना प्रति प्रतिपेटी १८ हजार रुपयाला त्याची विक्री झाली आहे. या हंगामातील पहिली पेटी पाठविण्याचा मान त्यांनी मिळवला असून कोकणातून हापूस आंब्याची पहिली पेटी पाठवण्याचा मान हा तिसऱ्यांदा मिळविला आहे. सिंधुदुर्गमधील उत्तम फोंडेकर हे प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. फोंडेकर यांनी बागेत जूनच्या शेवटच्या आठवड्यात आलेला मोहोर टिकवून ठेवून त्यावर फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रक्रिया केली.
अतिवृष्टीच्या काळात योग्य व्यवस्थापनाच्या जोरावर मोहोर टिकवून फळांचे संरक्षण केले. वेंगुर्ले फळ संशोधन केंद्राच्या सल्ल्याने विविध कीटकनाशक, बुरशीनाशकाच्या फवारण्या केल्या एकूण सहा झाडांवरील फळाची काढणी केली. सहा ते सात झाडांवर आलेल्या हापूस आंबाच्या दोन पेट्यां आंबा त्यांना मिळाला. हा आंबा त्यांनी पुणे येथील ग्राहकाला पाठवला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा २० ते २५ दिवस अगोदरच पहिली पेटी बाजारपेठेत आली आहे.
यावेळी अतिवृष्टी आंब्याचा मौसम सुरुवात होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे यंदा आंब्याच्या किंमती वर- खाली होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
from Parner Darshan https://ift.tt/3mPCvLS