
पारनेर : दरवर्षीप्रमाणे यंदाही इमेज क्रियेशनच्या माध्यमातून नाना करंजुले यांनी ‘कर्तुत्व’ हा दिवाळी विशेषांक संपादित केला होता. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तुत्ववान व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकणाऱ्या या विशेषांकाचे प्रकाशन ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले.
सामाजिक पंढरी म्हणून समजल्या जाणाऱ्या राळेगण सिद्धी येथे हा छोटेखानी पण तितकाच मोठा कार्यक्रम संपन्न झाला. या विशेषांकांमधील लेखाची संपूर्ण माहिती संपादक नाना करंजुले यांनी अण्णांना दिली. त्यांनी या अंकाचे तोंडभरून कौतुक केले. अशा प्रकारच्या पुस्तकातुन सर्वसामान्यांतून सामान्यत्व मिळण्यासाठी अनेकांना प्रोत्साहन मिळेल असे गौरवोद्गार अण्णासाहेब हजारे यांनी काढले.
या सामाजिक पंढरीचे सेवेकरी म्हणून ओळख असलेले राळेगण-सिद्धीचे माजी सरपंच जयसिंगभाऊ मापारी, आणि अण्णांचे सहकारी दत्ताभाऊ आवारी, नाना आवारी यांच्या सहकार्यातून हा आगळावेगळा सोहळा संपन्न झाला. विशेष म्हणजे यावेळी महसूल राज्यमंत्री कार्यालयाचे ओएसडी डाॅ. श्रीकांत तोडकर, सामाजिक कार्यकर्ते संतोष थोरात, सौ. थोरात वहिनी, माजी आरोग्य निरीक्षक दौलतराव शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या मनिषा खैरे, आमचे स्नेही नवी मुंबई पोलीस दलाचे गोपीनाथ पठारे, अभियंता शुभम शिंदे, सामाजिक कार्यकर्ते भाऊशेठ पावडे यांच्यासह निवडक निमंत्रित उपस्थित होते.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्याकडून मिळालेली कौतुकाची थाप यापुढे अशा प्रकारच्या विशेषांकाच्या निर्मिती करता नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
from Parner Darshan https://ift.tt/30dtdR4