साधकाचे अंतिम ध्येय काय आहे?

Table of Contents

ब्रम्हैक्य निर्माण झालेल्या साधकाला मोक्षाची प्राप्ती सर्वश्रेष्ठ आहे.पण हा मोक्ष जीवंतपणीच मिळतो हे लक्षात घ्या.माऊली म्हणतात, मोक्ष मेल्यापाठी आम्हासी होईल।ऐसे जे बोलती शतमुर्ख।। मोक्ष मिळवणे म्हणजे अहंता खाक होणे,लोभलालसा लोप पावणे,कुणाच्याही लौकिक प्रगतीने जळजळ न होणे,आपणच आपली अलौकिक प्रगती करत रहाण्याला प्राधान्य देणे म्हणजे मोक्ष आहे.माऊली म्हणतात,
मोक्षरेखे आला भाग्यें विनटला । साधूंचा अंकिला हरिभक्त ॥३॥
मोक्ष मिळणार आहेच पण इथेही मोक्षाच्या दोन बाजु आहेत.आनंदाची आणि परमानंदाची प्राप्ती.आनंदाच्या प्राप्तीत दुःख निवृत्ती आहे. मात्र परमानंदाच्या प्राप्तीत दुःखाचा उगमच होत नाही. त्यामुळे पुन्हा दुःखानुभुती नाही.
ही मोक्षस्थिती साधुने साधकाला आपलासा केल्यावरच प्राप्त होते.साधकाचं आचरण,प्रेमभाव,भक्तिभाव साधुला म्हणजे सदगुरुंना अंकित करण्याची गुरुकिल्ली आहे.माऊली स्वतःचा अनुभव ठेवताना म्हणतात,

ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनीं । हरि दिसे जनीं वनी आत्मतत्वीं ||४||
माऊली म्हणतात मला स्वतःला सदगुरुंच्या संगतीत सुख समाधान, परमानंद प्राप्त झाला आहे. त्यामुळेच मला चेतन आणि अचेतनातही हरि दिसत आहे. याचसाठी संतसहवास महत्त्वाचा आहे. आत्मतत्वाने हरीचं दर्शन आहे.हेच साधकाचं अंतिम लक्ष आहे.
रामकृष्णहरी

from https://ift.tt/3mJMNfZ

Leave a Comment

error: Content is protected !!