आपली मनविचार प्रणाली सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टींचा साधक आणि बाधक विचार करत असते.त्यात सहज वर्गीकरण केलं तर अविचारांचा भरणा जास्त भरतो.अविचार म्हणजे काय?भविष्याविषयी सतत चिंतीत रहाणं,मी गेल्यावर काय होईल?,मुलांच्या भविष्याविषयी सतत उलटसुलट विचार सुरू रहाणे.या गोष्टी अंतरमनात खोलवर सुरु असतात.वरच्या पातळीवर सुरु असलेले विचारही तितकेच त्रासदायक ठरतात.यामधे दुसऱ्याकडे पाहुन जगण्याची सवय प्रमुख आहे.
अमक्याने अमुक केले मग मला का जमणार नाही?ही भावना अत्यंत दुःख देणारी असते.अमका माझ्यापेक्षा बुद्धु असुनही इतकं कसं चांगलं जगु शकतो?ही इर्षा बेचैनीत भर घालणारी ठरते.
सज्जनहो बहुतांश सामान्य ते सुविधेत लोळणारा प्रापंचिक अशाच पद्धतीने जगत असतो.
या दुष्टचक्रात अडकले की जगण्यातली मौज निघून जाते. आपण यात अडकलो आहोत ही जाणीव झाली की मार्ग मोकळे होतात.
तुकोबाराय म्हणतात, प्रपंचाबाहेरी नाही आले चित्त।केले करी नित्य व्यवसाय।।
तुका म्हणे मज भोरप्याची परी।जाले सोंग वरी आत तैसे।।
अगदी खरं आहे ना?आम्ही आनंदी नसलो तरी तसं दाखवणं जास्त महत्त्वाचे झाले आहे. पण हे तर बहुरुप्याने सोंग घेतल्यासारखे आहे. तो पोलीसाचा वेश करतो तेव्हा त्याला पोलीस झाल्यासारखे वाटते.त्या रुबाबात तो वागत असतो पण आपण खरे पोलीस नाही हे तो मनोमन जाणत असतो.
या ठिकाणी त्या पुढचाही एक विचार करता येईल की बहुरुप्याचे घेतलेले सोंग माणसं ओळखतात पण तरीही गमतीने ते त्याला साथ देतात,म्हणून त्याने स्वतःला खरा पोलीस समजु नये.
जगण्यातल्या तऱ्हा अशाच आहेत.मग अंतरमनात चाललेली खळबळ थांबणार कशी?पाहु उद्याच्या भागात.
रामकृष्णहरी

from https://ift.tt/3Jzbrtk

By News

Leave a Reply

Your email address will not be published.