श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये नववर्षादरम्यान वैष्णोदेवी मंदिर परिसरात झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक भाविक जखमी झाल्याची माहिती आहे. यात 12 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. तर 20 हून अधिक भाविक जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मदत आणि बचावकार्य सुरू आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, स्थानिक प्रशासनाने आतापर्यंत सुमारे 20 जणांना रेस्क्यू केले आहे.
शनिवारी सकाळी शहरात चेंगराचेंगरी होऊन 20 जण जखमी झाले. त्याचवेळी 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. चेंगराचेंगरीची माहिती मिळताच तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आल्याचे पोलीस नियंत्रण कक्षाने सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, या चेंगराचेंगरीत 20 जण जखमी झाले आहेत. सर्वांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रियासी येथील नियंत्रण कक्षाने सांगितले की, कटरा येथील माता वैष्णो देवी भवनात झालेल्या चेंगराचेंगरीत लोक जखमी झाल्याचे वृत्त असून सध्या बचावकार्य सुरू आहे. चेंगराचेंगरीनंतर प्रशासन आणि व्यवस्थापनाने पुढील आदेशापर्यंत यात्रा स्थगित केली आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, कटरा येथील रुग्णालयातील बीएमओ डॉक्टर गोपाल दत्त यांनी सांगितले की, आम्हाला सध्या 6 जणांचे मृतदेह मिळाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आमच्याकडे अद्याप पूर्ण तपशील नाहीत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैष्णो देवी मंदिर परिसरात झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. तसेच, या घटनेत मृत्यू झालेल्या भाविकांच्या नातेवाईकांसाठी 10 लाख रुपये आणि जखमींना 2 लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे.

from https://ift.tt/3HufIfN

By News

Leave a Reply

Your email address will not be published.