सप्तधातुंचं निर्माण अन्नातुन होतं !

Table of Contents

अन्नापासून तयार झालेला देह आपण पहात असलो तरी आंतरिक क्रिया मोठ्या अदभूत आहेत.त्या समजून घेतल्या तर बरेच रोग जवळच येणार नाहीत.तोंडाने आपण जेवतो.तिथं चव प्रधान असते.मग ते चवीनं खाल्लेलं अन्न पोटात जातं.आतड्यांमध्ये ते गेल्यावर पचनक्रियेसाठी सगळी यंत्रणा कामाला लागले.तोंडात निर्माण झालेली लाळ साखर निर्माण करते,पाचक रस निर्माण होतो.जठराग्नी पेटतो आणि अन्नाचं विघटन होतं.हे सारं आपण जाणतो पण यापासून काय काय तयार होतं?मुख्यत्वे सप्तधातुचं पोषण.
अनुक्रमेरस,रक्त,मांस,हाडं,मज्जा,मेद,वीर्य हे ते सप्तधातु आहेत.यांचं पोषण यथायोग्य होण्यासाठी या तंत्राची माहिती असणं गरजेचं आहे.
गर्भधारणेपासुन अर्भकाला आईनं खाल्लेलं अन्न वाढवत असतं.तेव्हाच हे निश्चित होतं की हे जन्माला येणारं बाळ रोगी होणार,भोगी होणार की योगी होणार.पुर्ण पोसलेल्या पिंडातील दोष जन्मानंतरही घालवणं शक्य आहे. मुलांचा हेकडपणा,न ऐकणं,संभोगवृत्ती बळावणं,भांडखोर वृत्ती,हिसकावून जगण्याची वृत्ती सप्तधातुचं असात्विक पोषणानेच निर्माण होते.
पुर्वी ऋतुमानानुसार जगण्याची पद्धत होती.म्हणजे ज्या ऋतुत ज्या भाज्या,फळं धान्य येईल त्याच ऋतुत त्याचं भक्षण केलं जायचं.आपण आजही वृक्ष लागवड जुन,जुलैमधेच करतो.कारण त्याच काळात ते जगतात.पण इतर गोष्टी हाताबाहेर गेल्या आहेत.जनावरांचा मिलन काळ ठरलेला असतो.त्या व्यतिरिक्त त्यांना त्याचा मोह होत नाही. पण मनुष्याचं काय?
पुर्वी हे ही पाळलं जायचं.कोणत्याही ऋतुत कोणतीही फळं,धान्य,भाज्या निर्माण करण्याचं तंत्र म्हणजे विविध प्रकारच्या आजारांना दिलेलं निमंत्रण आहे. पण काय करणार?लोकसंख्या वाढत आहे आणि उत्पन्न त्या तुलनेत होत नाही. त्यामुळे हे सारं अपरिहार्य आहे. मग अन्नकोश पवित्र ठेवता येणारच नाही का?आजही ते शक्य आहे. ठराविक तंत्र आपण आत्मसात केले तर अन्नकोशावर विजय मिळवणे शक्य आहे. कसे?
ते उद्याच्या भागात पाहु.
रामकृष्णहरी

from https://ift.tt/lFDPyA8

Leave a Comment

error: Content is protected !!