
एखाद्या व्यक्तीच्या चारित्र्यावर जाहिरपणे चिखलफेक झालेली आपण नेहमी पहातो.त्यातही राजकीय व्यक्तींच्या बाबतीत हे आपण नेहमीच अनुभवतो.त्यात खरं किती,खोटं किती?हा नंतर चर्वणाचा विषय आहे.पण झालेली चुक जाहिर प्रगट करणारा पठ्ठ्या फारच भाग्याने पहायला मिळतो.एखाद्याला चुक ठरवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.
मासे पकडण्यासाठी गळ टाकुन तासंतास बसणारातलेच आहोत आम्ही. या सगळ्या धामधुमीत आमचं काय चाललय यावर विचार करावा वाटतच नाही. कारण आमचे कान सतत काहीतरी भयंकर ऐकण्यासाठीच आम्ही तरबेज केले आहेत.निर्भेळ आनंद देणाऱ्या गोष्टी कान डोक्यात जाऊ देत नाही हे मान्य करावच लागेल.डोळ्यांचही काही वेगळं नाही. ते ही सतत काहीतरी वासनादृष्य शोधत असतात.एक नाकच असा अवयव आहे की तो शेवटपर्यंत प्रामाणिक सेवा करत असतो.ते घाण वास सहन करीत नाही.
पुष्पपरिमळ,अत्तरसुवास,धुपारती गंध त्याला खुपच प्रिय.पण नाकाला चंदन धुपारतीचा परिमळ आवडला म्हणून शरीराला त्या कारणापर्यंत घेऊन जाण्यास ते असमर्थ आहे.आपले अवयव आपलं ऐकत नाहीत हे मान्य करायला हवं.
कर्मेंद्रिये आकळण्यासाठी काय केलं पाहिजे, हे तुकोबाराय सांगतात,
घेई घेई माझे वाचे | गोड नाम विठोबाचे ||
डोळे तुम्ही घ्या रे सुख | पाहा विठोबाचे मुख ||
तुम्ही आईका रे कान | माझ्या विठोबाचे गुण ||
मना तेथे धाव घेई | राही विठोबाचे पायी ||
तुका म्हणे जीवा | नको सोडू या केशवा ||
कर्मेंद्रिये विठोबाच्या चरणावर समर्पित झाल्याशिवाय चांगलं काही करण्यासाठी क्षमता निर्माण होणार नाही. आता ही विठ्ठल मात्रा काय आहे यावर पुढे आपण चर्चा करुच.तुर्तास चांगलं आणि सात्विक ऐकावं,पहावं,मनन करावं इतकचं करण्याचा प्रयत्न करुया.
रामकृष्णहरी
from https://ift.tt/3xS4ezo