
कुन्नूर (तामिळनाडू ) : भारतासाठी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. तामिळनाडूमधील कुन्नूरजवळ हेलिकॉप्टर अपघातात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांचे निधन झाले आहे. भारतीय हवाई दलाने हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि इतर 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत हे बुधवारी दुपारी 3 च्या सुमारास हवाई दलाच्या Mi-17VH हेलिकॉप्टरमध्ये नियोजित व्याख्यान देण्यासाठी कुन्नूर जिल्ह्यातील वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमध्ये जात होते त्यावेळी हा अपघात झाला.
हेलिकॉप्टरमध्ये जनरल बिपिन रावत यांच्याशिवाय त्यांची पत्नी, त्यांचे संरक्षण सहाय्यक, सुरक्षा कमांडो आणि भारतीय हवाई दलाचे कर्मचारी होते. भारतीय वायुसेनेच्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे की “या दुर्घटनेत जनरल बिपिन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि हेलिकॉप्टरमधील इतर 11 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, हे अत्यंत दु:खद आहे.”
देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बिपीन रावत यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. “तमिळनाडूमध्ये आज एका अत्यंत दुर्दैवी हेलिकॉप्टर अपघातात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि इतर 11 सशस्त्र दलाच्या जवानांच्या आकस्मिक निधनाने खूप दुःख झाले आहे. त्यांचे अकाली निधन हे आपल्या सशस्त्र दलांचे आणि राष्ट्राचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे, असे ट्वीट राजनाथ सिंह यांनी केले आहे.
जनरल बिपीन रावत हे आपल्या पत्नीसोबत एका कार्यक्रमासाठी गेले होते. वेलिंग्टन येथे आर्म्ड फोर्सेजचं कॉलेजात बिपिन रावत यांच्या पत्नीच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर बिपीन रावत हे कुन्नूर येथून दिल्लीला जाणार होते. मात्र, कुन्नूर येथे पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या हेलिकॉप्टरला दुपारी 12 वाजून 40 मिनिटांला लष्कराचे एमआय सीरीजटं हेलिकॉप्टर कोसळून अपघात झाला आहे. या अपघातानंतर लष्कराने चौकशीचे आदेश दिले आहेत.
from https://ift.tt/3pBYpCq