मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नव्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी संजय राऊत यांनी राज यांना कन्येच्या लग्नाची पत्रिका दिली. कौटुंबीक सोहळ्याच्या निमित्ताने राऊत यांनी राज यांची भेट घेतली. राज हे नव्या घरात राहायला आल्यानंतर त्यांच्या घरी भेट देणारे संजय राऊत हे पहिले शिवसेना नेते आहेत.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतीदिन होता. त्यामुळे संजय राऊत आज शिवतीर्थावर सपत्नीक आले होते. शिवसेना प्रमुखांना अभिवादन केल्यानंतर राऊत यांनी थेट राज ठाकरे यांचं नवं घर गाठलं. राऊत यांच्या मुलीचं 29 नोव्हेंबर रोजी लग्न आहे. या लग्नाची पत्रिका देण्यासाठी राऊत सपत्नीक राज यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी आले होते. यावेळी राज आणि राऊत यांच्यात मनमोकळ्या गप्पा झाल्या. ही कौटुंबीक भेट होती. यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं सांगितले जाते.
यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास गप्पा झाल्या. राऊत आणि राज ठाकरे यांच्यात राजकारणापलिकडे कौटुंबीक संबंध आहेत. तब्बल वर्षभरानंतर या दोन्ही नेत्यांची भेट होत आहे. राज ठाकरेंनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र्’ केल्यानंतर जवळपास 16 वर्षांनी संजय राऊत त्यांच्या निवासस्थानी आले होते.

दरम्यान, राऊत यांनी राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना कन्येच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका दिली आहे. काही दिवसांपूर्वी राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओकवर भेट घेतली. त्यावेळी त्यांनी शरद पवारांसह संपूर्ण कुटुंबाला मुलीच्या लग्नाचं निमंत्रण देत लग्नाची पत्रिका दिली होती. त्यानंतर राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचीही भेट घेऊन त्यांना कन्येच्या लग्नाचं निमंत्रण दिलं.

from https://ift.tt/31Yn2AX

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *