पारनेर : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेले श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान पिंपळगाव रोठा या राज्यस्तरीय” ब” वर्ग तीर्थक्षेत्रावर सालाबाद प्रमाणे श्री खंडोबाचा माघी पौर्णिमा उत्सव भक्तिभावाने बुधवारी संपन्न झाला. 
पुणे,नगर जिल्ह्यातील शेकडो भाविकांनी या पर्वणी काळात खंडोबाचे देवदर्शन व कुलधर्म ,कुलाचार विधीवत पार पाडले. सकाळी सहा वाजता श्रीखंडोबा मंगलस्नान पूजा साजशृंगार चढवून सकाळी सात वाजता श्री खंडोबा महापूजा, अभिषेक, आरती श्री नवनाथ व सो. लता भोर श्री गुलाब व सौ संगीता भोर, सौ. यमुना व श्री मुक्ताजी भोर (रा.भोरवाडी, वडगाव कांदळी ता.जुन्नर ) यांच्या हस्ते झाली. सकाळी ९.३० वा. श्री खंडोबा उत्सव मूर्तीची पालखीतील सवाद्य मिरवणूक निघाली.
ढोल लेझीमच्या तालावर भाविक भक्तांनी पालखीपुढे मनसोक्त लेझीम खेळून भक्तीचा आनंद घेतला. पालखी मिरवणूक मंदिर प्रदक्षिणा करून आल्यावर पालखीपुढे विधिवत पारंपरिक लंगर तोडण्यात आला नंतर पालखीला नैवद्य अर्पण केल्यावर पालखी परत मंदिरात विराजमान झाली सकाळी ११ वा. वाजल्यापासून जय मल्हार सेवा मंडळ भोरवाडी, कांदळी वडगाव ता. जुन्नर यांच्या वतीने लापशी चा महाप्रसाद वाटप सुरू झाले.
माघी पौर्णिमा म्हणजे (नव्याची पौर्णिमा ) म्हणून शेतकऱ्यांच्या शेतात तयार झालेल्या नवीन धान्याच्या राशीतून दीप बनवून खंडोबा मंदिरात महिला भक्ताकडून असंख्य दीपदान व नविन धान्य दान करण्यात आले. देवस्थानतर्फे पिण्याचे पाणी, दर्शन बारी, वाहने पार्किंग व इत्यादी नियोजन करण्यात आले होते.
देवस्थानचे अध्यक्ष ॲड. पांडुरंग गायकवाड, विश्वस्त बन्सी ढोमे, किसन धुमाळ, किसन मुंडे, उत्तम सुंबरे, देविदास शिरसागर, इत्यादींनी भावी भक्तांचे स्वागत केले.

from https://ift.tt/XaGqKif

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *