अहमदनगर: येथील कापड बाजार, माणिक चौक परिसरात असणाऱ्या श्रीमान कलेक्शन या वस्त्रदालनाच्या प्रथम वर्धापनदिनिमित्त खास ऑफर देण्यात आली असून, प्रत्येक खरेदीवर दहा टक्के सवलत एक ते सात फेब्रुवारीदरम्यान दिली जाईल, अशी माहिती संचालक महेश भणभणे यांनी दिली.
सूटिंग, शर्टिंग, रेडिमेड्स, एथनिक वेअर्सची दर्जेदार व्हरायटी आणि रास्त दर यामुळे ‘श्रीमान’ ला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. वर्धापनदिन आणि लग्नसराईनिमित्त येथील प्रत्येक खरेदीवर दहा टक्के सवलत देणारी आकर्षक योजना जाहीर करण्यात आली आहे. ग्राहकांचे प्रेम व विश्वास यामुळे वर्धापनदिनाचा आनंद साजरा करताना ही ऑफर दिल्याचे भणभणे यांनी सांगितले.
लग्नसराई, तसेच समारंभांसाठी एथनिक खास वेअर्स खरेदीकडे ग्राहकांचा कल असतो. दुसऱ्या मजल्यावर नवरदेवाच्या खास बस्त्याची प्रशस्त व आरामदायी व्यवस्था आहे. या ठिकाणी एथनिक वेअर्सची भरपूर व्हरायटी असून, देशाच्या विविध प्रांतांतील खास कलेक्शन उपलब्ध आहे. ब्रँडेड सूट, ब्लेझर, थ्री-पीस, ते सिक्स पीस फाइव्ह पीस, फाइव्ह-पीस, शेरवानी, इंडो-वेस्टर्न, इम्पोर्टेड फॅब्रिक्स, रॉ-सिल्क, पटियाला, केडिया शेरवानी, डिझायनर वेअर सूट्स असे एकाहून एक सरस नवरदेव पोशाख येथे आहेत.
नवीन ट्रेंडचे प्रिंटेड शेरवानी, जोधपुरीही उपलब्ध आहेत. याशिवाय आपल्या आवडीनुसार पोशाख शिवून मिळण्याचीही व्यवस्था असल्याने नवरदेवाचा रुबाब नक्कीच वाढेल. नवरदेवासाठी लागणाऱ्या मोजडी, ओढणी, माळा, हळदीसाठी पांढरा कुर्ता, टाय, कफलिंक्स, परफ्युम, रुमाल यांसारख्या पूरक वस्तूही ब्रँडेड स्वरूपात उपलब्ध आहेत, असे ते म्हणाले.

from https://ift.tt/r2H6AbTJL

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *