……शेतात सापडला जिवंत ‘बॉम्ब’ !

Table of Contents

पारनेर तालुक्यातील भाळवणी व भांडगाव शिवारा दरम्यान आज (मंगळवारी) सकाळी जिवंत बॉम्ब आढळून आला आहे. दरम्यान 1970 च्या दशकातील हा बॉम्ब असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उद्या लष्कराचे पथक या ठिकाणी भेट देणार असल्याची माहिती उपलब्ध झाली असून यानंतरच याचा उलगडा होणार आहे.
भाळवणी येथील हद्दीलगतच्या शृंगऋषी डोंगर आहे. या डोंगराच्या पायथ्याशी निलेश चेमटे यांची जमीन आहे. आज ते शेताजवळ गेले असताना त्यांना बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आली. हा बॉम्ब साधारण सहा सेंटीमीटर लांब तसेच 500 ग्रॅम वजनाचा असण्याची शक्यता आहे.
या परिसरात सन 1970 च्या दशकातील जिवंत बॉम्ब यापूर्वीही आढळून आला होता. लष्कराच्या पथकाने तो निकामी केला होता अशाच प्रकारचा बॉम्ब आज या ठिकाणी आढळून आल्याने निलेश चेमटे यांनी ही बाब भाजपच्या युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अभिजीत रोहोकले यांना सांगितल्यानंतर रोहोकले यांनी याबाबतची माहिती जिल्हाधिकारी व आपत्ती व्यवस्थापन कक्ष (भारतीय सेना) यांना दिली. दरम्यान लष्करी पथक या ठिकाणी उद्या ( बुधवारी) दाखल होणार असून त्यानंतरच या घटनेचा उलगडा होणार आहे. तोपर्यंत येथे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती अभिजीत रोहोकले यांनी दिली.

from Parner Darshan https://ift.tt/3wtnYse

Leave a Comment

error: Content is protected !!