
शेतीकडे अनेकजणांचा कल वाढत चालल्याने शेतजमीन विकत घेण्याची जणू काही स्पर्धाच आहे. मात्र जमीन घेताना अनेकांची फसवणुक झाल्याच्या घटना आहेत. तुमच्यासोबत असे होऊ नये संपूर्ण लेख नक्की वाचा. जमीन विकत घेताना सर्वात अगोदर रस्ता कुठे आहे? काय आकार आहे? यासारख्या अनेक गोष्टींचा विचार करा.
शेत रस्ता : जर जमीन बिनशेती असेल तर जमीनीपर्यंतचा रस्ता नकाशामध्ये असतो. मात्र जमीन बिनशेती नसेल तर व रस्ता खाजगी असल्यास रस्त्यासाठी दाखवलेली जमीन व संबंधित मालक यांची हरकत नसल्याची खात्री करून घ्या.
आरक्षित जमिन : शासनाने सदर जमिनीमध्ये कोणत्याही प्रकारचे आरक्षण केले आहे का? हे पहा. उदा. हिरवा पट्टा, पिवळा पट्टा आदी नसल्याची खात्री करा. शिवाय उताऱ्यावरील मुळ मालक व प्रत्यक्ष वहीवाट दार वेगवेगळे आहेत का? याची खात्री करा.
सातबारा उताऱ्यावरील नावे : उताऱ्यावरील नावे विक्री करणाऱ्या व्यक्तीची आहेत का? याची खात्री करा. त्यावर एखादा मयत व्यक्ती, जुना मालक किंवा इतर वारसाची नावे असल्यास ते कायदेशीर पद्धतीने काढुन घेणे आवश्यक असते. तसेच शेत जमिनीवर कोणत्याही बँकचा बोजा आहे कि नाही? याची खात्री करून घ्या. कारण एखादा न्यायालयीन खटला चालू असेल तर त्या बाबतीतले संदर्भ तपासून पहा.
जमिनीची हद्द : शेतजमिनीची हद्द नकाशाप्रमाणे आहे का? हे तपासून पहा. तसेच याबाबत शेजारील जमीन मालकाची काही हरकत आहे का नाही? याची खात्री करा. उताऱ्यावर इतर अधिकार या रकान्यात इतर नावे असतील तर त्याबाबतीत माहिती करून घ्या. जमिनीवर शेतातील घर सोडून इतर कोणतेही बांधकाम करायचे असल्यास बांधकामाचा प्रकार प्रमाणे जमीन बिनशेती करणे घ्या. तसेच शेत जमिनीमधून नियोजित महामार्ग, रस्ता इत्यादी नसल्याची खात्री करावी किंवा याची उताऱ्यावर नोंद आहे की नाही? याची खात्री करून घ्या.
खरेदीखत : दुय्यम निंबधक कार्यालयात आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून व शुल्क भरून खरेदीखत करा. काही कालावधीनंतर खरेदी केलेल्या जमिनीचा नकाशा व आपल्या नावावर उताऱ्यामध्ये नोंद आहे की नाही? याची खात्री करा. मुळ जमीन मालकाने आर्थिक व्यवहार पूर्ण केल्याशिवाय खरेदीखत करू नका.
from Parner Darshan https://ift.tt/3C4qxCt