शेतकऱ्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही !

Table of Contents

पारनेर – संसदेतील पाशवी बहुमताच्या जोरावर केंद्र सरकारने शेतकरी विरोधी तीन कायदे मंजुर केले आहेत. त्याच्या विरोधात हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून बसले आहेत. हे आंदोलन बदनाम करण्याचा,फोडण्याचा, व संपविण्याचा प्रयत्न सरकारणे केला आहे. या आंदोलनात मागील अकरा महिन्यांत सहाशे पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपले बलिदान दिले आहे.
लखिमपुरखिरी या ठिकाणी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर मंत्र्याच्या मुलाने गाडी चढवून चार शेतकरी व एका पत्रकाराचा बळी घेतला आहे. या घटनेत शहिद झालेल्या शेतकऱ्यांच्या अस्थिंचे कलश घेऊन देशभर या आंदोलनाबाबत जनजागृती यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
शेतकरी विरोधी कायदे शेती उद्ध्वस्त करणारे आहेत व शेतीमाल आयात निर्यात धोरणामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जात आहे. दिल्ली सीमेवर चालू असलेले हे ऐतिहासिक आंदोलन आहे तीन काळे कायदे मागे घेतल्या शिवाय व किमान आधारभूत किमतीचा कायदा केल्या शिवाय हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही. शेतकऱ्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. असे प्रतिपादन किसान सभेचे राज्य सचिव कॉ.नामदेव गावडे यांनी केले.
सहा नोव्हेंबर पासुन कोल्हापूर येथुन सुरू झालेली शहिद किसान अस्थिकलश यात्रेचे पारनेर तालुक्यात आगमन झाले. जवळा, पानोली याठिकाणी प्रबोधन सभांचे आयोजन करण्यात आले. पारनेर येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ शहिदांना अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी भाकपचे राज्य सहसचिव कॉ. सुभाष लांडे, किसान सभेचे राष्ट्रीय कौन्सिल सदस्य कॉ. बन्सी सातपुते,शाहिर गायकवाड कॉ. संतोष खोडदे, कैलास शेळके, पांडुरंग गंधाक्ते, सुधीर टोकेकर, बाबा अरगडे, अप्पासाहेब वाबळे, सुलाबाई आदमाने, बबन रावडे, हेमंत पाटील, चंद्रकांत चौधरी, रघुनाथ येणारे, अशोक गायकवाड आदी उपस्थित होते.

from Parner Darshan https://ift.tt/30k84oi

Leave a Comment

error: Content is protected !!