‘शेअर मार्केटची कृपा’; ‘या’ आगळ्या-वेगळ्या बंगल्याची चर्चा!

Table of Contents

सर्वसाधारणपणे बंगल्यावर मुलाचे नाव, आई-वडिलांचे नाव, उद्योग व्यवसायाचे नाव, देवाचे नाव ठेवलेले तुम्ही पहिले असेल. मात्र सोशल मिडीआयवर एका घराची जोरदार चर्चा आहे. कारण या बंगल्याचं नाव चक्क ‘शेअर मार्केटची कृपा’ असे ठेवले आहे. 
या बंगल्याचे मालक आहे बदलापूर येथील रहिवाशी मुकूंद खानोरे. मुकूंद यांनी शेअर मार्केटच्या व्यापारातून कोट्यवधी कमावले असल्याने त्यांनी आपल्या बंगल्याचं नावही ‘शेअर मार्केटची कृपा’ असं दिलं आहे.

ज्या क्षेत्रातून आपणास पैसा मिळतो, त्याबद्दल आपण नेहमीच कृतज्ञता व्यक्त करतो. कारण, आपलं पोट त्यावर असतं. म्हणूनच, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुकूंद यांनीही बंगल्याचे नाव ‘शेअर मार्केटची कृपा’ असे ठेवलंय. त्यामुळे या बंगल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
मुकुंद खानोरे एक तरुण व्यावसायिक आहेत. ते मूळचे बदलापूरला राहणारे असून कॉलेजमध्ये असल्यापासून त्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक सुरू केली होती. त्यानंतर जम बसवत त्यांनी यश मिळवले आहे. आज ते कोट्यधीश बनले आहेत. नुकतीच त्यांनी बदलापूरजवळच्या कासगावमध्ये मोठी जागा विकत घेतली आहे. सध्या खानोरे हे शेअर मार्केटचे सेमीनार देखील घेतात.

from https://ift.tt/3p6S1nx

Leave a Comment

error: Content is protected !!