आपल्या देशात शून्य रुपयांची नोट छापली गेली होती. ही न नेमकी का छापली होती? चला, तर त्याबद्दल अधिक सविस्तर जाणून घेऊया… 
एका खास मोहिमेंतर्गत शून्य रुपयांची नोट छापली गेली होती. 2007 साली दक्षिण भारतातील एनजीओ 5th पिल्लरने 5 लाखांच्या या नोटा छापल्या होत्या. हिंदी, तेलगु, कन्नड आणि मल्लाल्यम या चार भाषेत या नोटा छापून वाटल्या गेल्या होत्या. या नोटेवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो होता. चलनात असलेल्या नोटांसारखी ही नोट दिसत असली तरी या नोटेचे बाजारमूल्य शून्य होते. 5th पिल्लर संस्था लाच मागण्याऱ्यांना ही नोट देत. या संस्थेचे तामिळनाडुच्या काही जिल्ह्यांमध्ये कार्यालय होती.
या नोटेवर काही संदेश लिहिले गेले होते. या माध्यमातून भ्रष्टाचार संपण्यासाठी एक पाऊल उचललं गेलं. ‘भ्रष्टाचार संपवा’, ‘कुणी लाच मागितली तर या नोटा द्या आणि आम्हाला सांगा’, ‘ना घ्यायची ना द्यायची शपथ घेऊयात’, असे संदेश यावर लिहीले गेले होते. तसेच नोटेच्या डाव्या बाजूला संस्थेचा फोन नंबर आणि ईमेल आयडी छापण्यात आला होता.

from https://ift.tt/33Y58PZ

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *