शिर्डी : दोन वर्षांपूर्वी 14 फेब्रुवारी रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा याठिकाणी आतंकवाद्यांनी मोठा घातपात घडवला होता. यामध्ये अनेक भारतीय सैनिक मृत्यूमुखी पडले होते. या घटनेनंतर बरोबर दोन वर्षांनी महाराष्ट्रातील शिर्डी येथील साईबाबा मंदिरात बॉम्बस्फोट घडवण्याचा दहशतवाद्यांचा बेत असल्याची खळबळजनक माहिती एटीएसच्या तपासात समोर आली आहे. गुजरात एटीएसने दुबईहून आलेल्या तीन जणांना अटक केली असून त्यांनी शिर्डीतील साईबाबा मंदिराची रेकी केल्याची कबुली दिली आहे.
दहशतवाद्यांच्या कटाची माहिती उघड होताच शिर्डी शहरात मोठी खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मौलाना शब्बीर पठाण, अयुब झबरावाला आणि मौलाना गनी उस्मानी असे अटक केलेल्या तीन दहशतवाद्यांची नावे असून ते दुबईतून भारतात आले होते. त्यांनी घातपात घडवण्यासाठी शिर्डी येथील साईबाबा मंदिराची रेकी केली होती. संबंधित सर्व दहशतवाद्यांचा संबंध पाकिस्तानातील एका दहशतवादी संघटनेशी असल्याची माहिती गुजरात एटीएसने दिली आहे.
यासोबतच अटक केलेल्या दहशतवाद्यांनी एका हिंदी चॅनेलच्या संपादकाच्या शिर्डीतील घराची देखील रेकी केली होती. गुप्त माहितीच्या आधारे गुजरात एटीएसने कारवाई करत संबंधित तिन्ही दहशतवाद्यांना ताब्यात घेतलेले आहे. संबंधित अतिरेक्यांकडे अवैध हत्यारं, विस्फोटक पदार्थ आढळून आले आहेत. या प्रकरणी एटीएसने आतापर्यंत एकूण आठजणांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.
शिर्डी हे देशातील प्रसिद्ध देवस्थान आहे. देशभरातील कानाकोपऱ्यातून करोडो भाविक दरवर्षी या मंदिरात दर्शन घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे याठिकाणी मोठी गर्दी असते. संवेदनशील देवस्थान असणाऱ्या साई मंदिरात बॉम्बस्फोट घडवण्याबाबत धमकीचे निनावी पत्र, तसेच मेल यापूर्वी देखील अनेकदा आले आहे. अशात दुबईहून आलेल्या तीन दहशतवाद्याने दिलेल्या धक्कादायक कबुलीनंतर शिर्डी शहरात खळबळ उडाली आहे.

from https://ift.tt/XOZmATh

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *