
मुंबई : अनेक वर्षांची यूती असलेल्या शिवसेना आणि भाजप यांच्यात मुख्यमंत्रीपदावरुन वाद वाढल्यानंतर अखेर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. सरकार स्थापन झाल्यानंतर देखील भाजप आणि शिवसेना यांच्यातील वाद वाढतच आहे. अशातच आता पुढील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार का असा सवाल देखील उपस्थित होत आहे. त्यावर आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोठं वक्तव्य केले आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात काही जास्त फरत नाही. शिवसेनेच्या 56 जागा आहेत तर राष्ट्रवादीच्या 54 जागा आहेत. फरक केवळ 2 जागांचा आहे. 2024 मध्येही राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार अस्तित्वात येईल, असे शरद पवारांनी पुण्यात आपल्या मित्रांशी बोलताना खासगीत सांगितले होते, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
शरद पवारांचं ठरलं आहे की, 2024 मध्ये उद्धव ठाकरे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करायचे आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. 2019मध्ये राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्यात राष्ट्रवादीचा मोठा वाटा असल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र नव्हतो तेव्हा शिवसेनेने ठाणे महापालिकेच्या निवडणूकीत स्वत:ला हवे तसे वॉर्ड पाडून घेतले, असा आरोप देखील त्यांनी शिवसेनेवर केला आहे. जितेंद्र आव्हाडांच्या या वक्तव्याची आता मोठी चर्चा होताना दिसत आहे.
from https://ift.tt/30dxy75