
येत्या सात फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन वीकला सुरुवात होत आहे. या सात दिवसांत आपल्या पार्टनरला, क्रशला किंवा आवडत्या व्यक्तीवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न केला जातो. चला, तर या वीकचे वेळापत्रक जाणून घेऊयात…
7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी हा प्रत्येक दिवस वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो आणि साजरा केला जातो. आता व्हॅलेंटाईन वीक यायला फक्त काही दिवस बाकी आहेत. त्यामुळे व्हॅलेंटाईन विकची पूर्ण लिस्ट (Valentine’s Week 2022 full List) आम्ही तुमच्यासाठी आणली आहे. जेणेकरून कोणत्या तारखेला कोणता डे आहे, याची तुम्हाला माहिती मिळेल.
7 फेब्रुवारी : हा दिवस रोझ डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या पार्टनरला गुलाबाचं फूल देऊन प्रेम व्यक्त करतात.
8 फेब्रुवारी : हा दिवस प्रपोज डे म्हणून साजरा केला जातो. ज्याच्यावर तुमचे प्रेम आहे त्याबद्दल व्यक्त होण्यासाठी आजचा दिवस एक संधी आहे.
9 फेब्रुवारी : हा दिवस चॉकलेट डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी पार्टनरला वेगवेगळी आणि त्यांच्या पसंतीची चॉकलेट्स गिफ्ट म्हणून दिली जातात.
10 फेब्रुवारी : हा दिवस टेडी डे म्हणून साजरा केला जातो. पार्टनरला टेडीबेअर गिफ्ट केला जातो.
11 फेब्रुवारी : हा दिवस प्रॉमिस डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी लोक पार्टनरला सोबत राहण्याचं वचन देतात.
12 फेब्रुवारी : या दिवशी हग डे साजरा केला जातो. जोडीदाराला मिठी मारून आपले प्रेम व्यक्त केले जाते.
13 फेब्रुवारी : हा दिवस किस डे म्हणून साजरा केला जातो. पार्टनरसोबत नातं आणखी घट्ट करण्याचा दिवस आहे.
14 फेब्रुवारी : व्हॅलेंटाईन विकचा शेवटचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे. बहुदा याच दिवशी लोक एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करतात.
from https://ift.tt/KEQZTbe