पारनेर : ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांची राळेगणसिद्धी येथे जाऊन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ बी.जी.शेखर पाटील यांनी भेट घेतली. त्यांनी अण्णांच्या प्रकृतीची विचारपूस करून उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा सुद्धा केली. अण्णांनी सुद्धा पोलीस महानिरीक्षकांच्या कामाचे कौतुक केले. त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
डाॅ बी.जी शेखर पाटील हे पोलीस दलातील अत्यंत कार्यक्षम, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सर्व परिचित आहेत. गुन्हेगारी नियंत्रणावर अधिक भर देत असताना अंतर्गत कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करण्याच्या अनुषंगाने सतत कार्यतत्पर असणारे ते आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी आपल्या कामाचा ठसा प्रत्येक ठिकाणी उमटवला आहे. नवी मुंबईत सुद्धा अतिरिक्त पोलीस आयुक्त गुन्हे या पदावर काम करीत असताना त्यांनी अनेक गुन्ह्यांची उकल केली. कित्येक वर्ष प्रलंबित असलेले गुन्हे उघडकीस आणून आरोपींना जेरबंद केले.
दरम्यान काही महिन्यांपूर्वी डाॅ.बी .जी शेखर पाटील यांची नाशिक परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक या पदावर राज्य सरकारने नियुक्ती केली. त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये नाशिक ,अहमदनगर, धुळे आणि नंदुरबार हे चार जिल्हे आहेत. येथील पदभार घेतल्यानंतर त्यांनी गुन्हेगारी नियंत्रणाच्या अनुषंगाने पावले उचलली आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करण्याबरोबरच अंतर्गत शांततेवर विशेष भर दिला आहे. प्रलंबित गुन्ह्यांची उकल करून संबंधित गुन्हेगारांना अटक करण्यावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. अत्यंत प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून नावलौकिक प्राप्त केलेल्या डाॅ. शेखर पाटील हे ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांना आपला आदर्श मानतात. त्यामुळे आपली जबाबदारी सांभाळत असताना वेळ काढून ते राळेगणसिद्धी येथे येऊन अण्णांची भेट घेतात. त्यांचा आशीर्वाद आणि प्रेरणा घेऊन पुन्हा आपल्या कर्तव्यावर रुजू होतात.
दरम्यान मंगळवारी डाॅ. बी.जी शेखर यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. या व्यतिरिक्त इतर विषयांवर चर्चा सुद्धा केले. नाशिक परिक्षेत्र मध्ये प्रमुख म्हणून आपण चांगले काम करत आहात अशा प्रकारची पोहोच पावती अण्णा हजारे यांनी या वेळी दिली. याप्रसंगी राळेगण-सिद्धी चे माजी सरपंच जयसिंग मापारी, अण्णांचे सहकारी दत्ता आवारी यांच्यासह पारनेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळप उपस्थित होते.
▪अण्णांच्या जनआंदोलन संग्रहालयाला दिली भेट
छायाचित्र , वृत्तपत्र त्याचबरोबर विविध पत्रव्यवहारातुन उलगडणार सामाजिक कार्य अण्णासाहेब  हजारे यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी खर्च केले. भ्रष्टाचाराविरोधात त्यांनी अनेक आंदोलने केली. त्याच बरोबर माहितीचा अधिकार, दप्तर दिरंगाई, लोकपाल  याकरता ही त्यांनी मोठी चळवळ उभारून संघर्ष केला. त्यांच्या कार्याची माहिती तरुण पिढीला व्हावी याकरता राळेगणसिद्धी येथे एक संग्रहालय साकारण्यात आले आहे. छायाचित्र, वृत्तपत्राचे कात्रण त्याचबरोबर विविध पत्रव्यवहार यातून अण्णांचे जनआंदोलने खऱ्या अर्थाने उलगडत आहेत. या जनांदोलन संग्रहालयाला डाॅ .बी.जी शेखर यांनी भेट देऊन कौतुक केले.

from https://ift.tt/3dpJ6XK

By News

Leave a Reply

Your email address will not be published.