अहमदनगर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट (एमबीए, एमसीए), आर्किटेक्‍चर अशा विविध अभ्यासक्रमांच्या आणि डिप्लोमानंतर इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाची प्रवेशप्रक्रिया या वर्षी केंद्रीय पद्धतीने (ऑनलाइन) कशी राबविणार, याविषयी अनेक प्रश्‍न विद्यार्थी व पालकांच्या मनात आहेत. याच अनुषंगाने ‘सकाळ विद्या’ आणि पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट व नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ यांच्यातर्फे विनामूल्य मार्गदर्शनपर चर्चासत्राचे आयोजन केले आहे.
सावेडी रस्ता येथील माऊली सभागृहात येत्या रविवारी (ता. १४) सायंकाळी ४ वाजता चर्चासत्र होणार आहे. त्यात विविध अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेमध्ये प्रवेशासाठी अर्ज करताना विद्यार्थी व पालकांना अनेक प्रश्‍न पडतात. जसे की, ही प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने कशी होणार आहे? प्रवेशाच्या किती फेऱ्या होणार व कशा होतील? ही प्रवेशप्रक्रिया केव्हापर्यंत चालेल? महाविद्यालये कधी सुरू होणार आदी. याबाबत चर्चासत्रात सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पाळून या चर्चासत्राचे आयोजन केले आहे. त्यामुळे जागा मर्यादित असल्याने, प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार आहे.

कोणत्या शाखेत जायचे हे निश्‍चित झाले असले, तरीही सीईटी किंवा जेईईच्या गुणांच्या (पर्सेंटाईल) आधारे कॉलेजची प्राथमिकता कशी ठरवावी व त्यासाठी ऑप्शन फॉर्म कसा भरावा, योग्य कॉलेजची निवड कशी करावी, याची माहिती विद्यार्थी व पालकांना असली, की ऑनलाइन प्रवेश अर्ज भरताना गोंधळ होत नाही.
 ‘इंजिनिअरिंगनंतरच्या रोजगाराच्या संधी’ या विषयावर तज्ज्ञ डॉ. शीतलकुमार रवंदळे बोलतील. तसेच, ‘बारावीनंतरचे करिअर’ यावर विवेक वेलणकर मार्गदर्शन करतील. त्यानंतर पीसीएममध्ये ४५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी गुण असतील तर कोणते पर्याय उपलब्ध आहेत? त्याचबरोबर शैक्षणिक कर्ज, कट ऑफ, स्कॉलरशिप व डिप्लोमानंतर इंजिनिअरिंगची दुसऱ्या वर्षाची प्रवेशप्रक्रिया आणि प्रवेशासाठी आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता, बारावीनंतर उपलब्ध संधी व कॉलेजचे पर्याय या विषयांवर प्रा. केतन देसले मार्गदर्शन करणार आहेत.
‘आर्किटेक्‍चरमधील करिअर, प्रवेश व कॉलेजचे पर्याय’ यावर डॉ. महेंद्र सोनवणे मार्गदर्शन करतील. डॉ. अनिशकुमार कारिया ‘एमबीए व व्यवस्थापन शाखेतील नोकरीच्या संधी’ याविषयी संवाद साधतील. विद्यार्थी व पालकांच्या या वर्षीच्या प्रवेशप्रक्रियेसंबंधी असलेल्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे या चर्चासत्रातून मिळतील. त्यामुळे नक्की सहभागी व्हा.
चर्चासत्राविषयी…
कधी : रविवार, १४ नोव्हेंबर २०२१
केव्हा : सायं ४ वाजता
कुठे : माउली सभागृह, सावेडी रोड
मार्गदर्शक ः श्री. विवेक वेलणकर, डॉ. शीतलकुमार रवंदळे, डॉ. ललित वाधवा, डॉ. अनिशकुमार कारिया
येथे साधा संपर्क…
विद्यार्थी व पालकांसाठी मर्यादित विनामूल्य प्रवेश, नावनोंदणी आवश्‍यक
अधिक माहितीसाठी संपर्क : ९८८१९०७२५२
नाव नोंदणीसाठी क्यूआर कोड

from Parner Darshan https://ift.tt/3otGmOl

By News

Leave a Reply

Your email address will not be published.