
नाशिक : अभिनेत्री कंगना रनौत हिने स्वातंत्र्याविषयी विधान केल्यानंतर तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. मात्र ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी कंगनाच्या विधानाचे समर्थन केले होते. ते म्हणाले की, स्वातंत्र्याबाबत कंगनाने जे विधान केले ते खरेच आहे. कंगना खरं बोलली. मी तिच्या विधानाचे समर्थन करतो असे गोखले म्हणाले होते. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार नाशिक जिल्ह्यातील निफाड दौऱ्यावर होते. यावेळी त्यांना विक्रम गोखलेंच्या विधानाविषयी विचारण्यात आले. त्यावर बोलताना त्यांनी अशा लोकांच्या वक्तव्याची नोंद घ्यावी असे मला वाटत नाही. असे लोक असतात समाजात,असे म्हणत याविषयावर जास्त भाष्य करणे टाळले आहे.
भाजप-शिवसेना एकत्र यावी असेही केले होते विधान.
75 व्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण महासंघाच्यावतीने पुण्यामध्ये ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना विक्रम गोखले यांनी पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केले होते. तसेच शिवसेना व भाजपा एकत्र आली तर बरं होईल. त्यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन, असेही ते म्हणाले होते.
कंगना खरंच बोलली
कंगना रनोटविषयी बोलताना विक्रम गोखले म्हणाले होते की, ‘कंगना रनोट जे बोलली आहे ते खरेच आहे. देशाला स्वातंत्र्य भीक मागूनच मिळालेले आहे यावर मी सहमत आहे. हे दिलं गेलं आहे. हे ज्या योद्ध्यांनी मिळवण्याचा प्रयत्न केला त्या योद्ध्यांना फाशी जाताना मोठमोठे लोक फक्त बघत राहिले. त्यांना वाचवण्यात आले नाही. आपल्या देशाचे हे लोक ब्रिटिशांविरुद्ध उभे राहत आहेत, हे बघून देखील त्यांना फाशीपासून वाचवण्यात आले नाही, असेही लोक केंद्रीय राजकारणामध्ये होते. मी भरपूर वाचलेले आहे’ असे गोखले म्हणाले होते. यानंतर त्यांच्यावरही मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे.
from Parner Darshan https://ift.tt/3oxC9Jh