पारनेर :तालुक्यातील वासुंदे येथील ग्रामदैवत श्री. भाऊसाहेब महाराजांच्या वार्षिक यात्रा उत्सव निमित्ताने जिल्हास्तरीय निकाली कुस्त्यांच्या आखाडाचे आयोजन मंगळवार ( दि.२२ फेब्रुवारी) रोजी दुपारी २ वाजता करण्यात आल्याची माहिती कोअर कमिटीचे सदस्य डॉ.उदय बर्वे, शरद झावरे व डॉ.बाबासाहेब गांगड ,अमोल उगले यांनी दिली.
निलेश लंके प्रतिष्ठान व वासुंदे ग्रामस्थांच्या वतीने प्रथमच वासुंदे गावात या जिल्हास्तरीय निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले असून या कुस्ती आखाड्याचे उद्घाटन आमदार निलेश लंके यांच्या होणार आहे.या आखाड्यात स्व.पै. बाळासाहेब व स्व.पै. विलास रामभाऊ साळुंके यांच्या स्मरणार्थ पै. सतिष,अविनाश, ऋषिकेश, विघ्नेश साळुंके यांच्याकडून निकाली कुस्तीस चांदीची गदा प्रथम क्रमांकाची निकाली कुस्ती पैलवानाला देण्यात येणार असल्याचे पैलवान अनिल हिंगडे, पैलवान गणेश शिरतार व दत्ता जगदाळे यांनी दिली आहे. वासुंदे येथील न्यू इंग्लिश स्कूल समोरील या पटांगणात निकाली कुस्त्यांचे आयोजन मंगळवारी करण्यात आले आहे.
या निकाली कुस्ती आखाड्यामध्ये राज्यातील, जिल्ह्यातील अनेक नामवंत पैलवानांची कुस्ती लावण्यात आली असून हजारो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.या उद्घाटन कुस्ती : (१) पै. प्रविण बिडकर (मांडवे) X पै.विक्रम पवार (पारनेर) (२) पै. विकी काकडे (आळेफाटा) पै.साई हुबाळे (पारनेर) लावली जाणार आहे.
या निकाली कुस्तीच्या मैदानासाठी प्रथम क्रमांकासाठी आमदार निलेश लंके यांच्या वतीने ३३ हजार ३३३ रुपये बक्षीस तर दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीसाठी लंके प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष बाळासाहेब खिलारी दत्तात्रय निवडूंगे व किरण तराळ यांच्यावतीने २१ हजार ३३३ रुपये बक्षीस ठेवण्यात आले तर तृतीय क्रमांकासाठी बाजार समिती उपसभापती विलासराव यांच्या वतीने १५ हजार ३३३ तर तृतीय क्रमांकासाठी माजी सरपंच प्रतापराव पाटील यांच्या वतीने११ हजार ३३३ ,ग्रामपंचायत सदस्य पो.द. साळुंके यांच्या वतीने पाचव्या क्रमांकासाठी ,समता मित्रमंडळाच्या वतीने ११ हजार रुपये ३३३ बक्षीसे देण्यात येणार आहे.
या निकाली कुस्त्यांच्या आखाड्यामध्ये महाराष्ट्रातील व नगर जिल्ह्यातील नामवंत पैलवान जोड यांची कुस्ती या आखाड्यात लावण्यात आली असून कुस्ती निकाली झाली तरच इनाम देणार असल्याची घोषणा आयोजकांनी केली आहे. त्यामुळे वासुंदे गावातील निकाल कुस्ती पाहण्याची पर्वणी कुस्ती प्रेमींना यानिमित्ताने मिळणार आहे.
पारनेर तालुक्यातील वासुंदे येथील ग्रामदैवत श्री भाऊसाहेब महाराजांच्या वार्षिक यात्रा उत्सव निमित्ताने निकाली कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन मंगळवारी करण्यात आली असून प्रसिद्ध कुस्ती निवेदक पैलवान अक्षय मुळूक म्हणून काम पाहणार आहे तर दुसरीकडे या निकाली कुस्त्यांचे आखाड्यात सैराटची हलगी जोरदार कडाडणार आहे.तर दुसरीकडे या आखाड्यात कुस्तीची उपासना करणाऱ्या माजी पैलवानांचा सन्मान केला जाणार असल्याची माहिती डॉ.उदय बर्वे व शरद झावरे यांनी दिली.

from https://ift.tt/vXoyStQ

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *