✒ सतीश डोंगरे 
शिरूर : पुणे ग्रामीण पोलिस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांची पदोन्नतीवर पिंपरी चिंचवडच्या सहाय्यक पोलीस आयुक्त ( ACP ) पदी नियुक्ती झाली आहे. पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण हे श्री. घनवट यांचे मूळ गाव. त्यांना मिळालेल्या या बढतीमुळे गावात आनंद व्यक्त करण्यात आला आहे.
घनवट यांची दबंग पोलिस अधिकारी म्हणून ओळख आहे. सुरुवातीला ते मुंबईला होते . मुंबईत त्यांनी जबरदस्त कामगिरी केली. मुंबईमध्ये 1992 ला दंगली झाल्या तेव्हा फ़क्त ते इनचार्ज असणाऱ्या परिसरात दंगली होऊ शकल्या नाहीत अशी नोंद ‘अर्धी मुंबई’ या यूनिक फीचर्स ने प्रकाशित केलेल्या पुस्तकात करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांची सातारा येथे बदली झाली. सातारा येथे आपल्या कार्यकाळात त्यांनी अद्वितीय काम केले.
साधारणतः पोलीस अधिकाऱ्याची २ वर्षांनंतर बदली होते, मात्र चांगल्या कामामुळे आणि कामाच्या धडाडीमुळे त्यांना कार्यकाळापेक्षा अडीच वर्षे जादा काम करता आले. त्यानंतर नोव्हेंबर २०१८ मध्ये त्यांची पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण शाखेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली. याठिकाणी गेल्या अडीच वर्षांत त्यांनी खून, दरोडे, वाहनचोरी, गोळीबार, फसवणूक आदी गंभीर गुन्ह्यांची मोठ्या प्रमाणात उकल करून त्यांनी आणि त्यांच्या टीमने जबरदस्त कामगिरी केली.
तपासात असलेल्या धडाडीमुळे अनेक महत्वाच्या केसचा छडा लावण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती ती त्यांनी यशस्वी करून दाखविली.
पद्माकर घनवट यांना व्यायाम करण्याची चांगलीच आवड आहे. वय वर्षे ५२ असून घनवट आजही न चुकता मैदानावर येतात. त्यांना धावण्याची आवड आहे. आतापर्यंत त्यांनी १० मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला आहे. धावण्यासोबतच त्यांना क्रिकेटचीही चांगलीच आवड आहे. बॅटिंग करुन स्वतः आऊट होण्यापेक्षा बॉलिंग करुन दुसऱ्याला आऊट करणे त्यांना जास्त आवडते.
जुन्या काळी गावाकडे शिक्षणाच्या फार सोयी नसायच्या अशा काळात तसे उच्च शिक्षण मिळणे अवघडच परंतू अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यानी उच्च शिक्षण घेतले. पुढे पोलीस दलात जायचे हे स्वप्न उराशी बाळगले आणि ते जिद्दीने पूर्ण केले. आज त्यांची सहाय्यक पोलीस आयुक्त पदी नियुक्ती झाली आहे. वाडेगव्हाण ग्रामस्थांच्या दृष्टीने हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. निश्चितच संपूर्ण गावाला त्यांच्याबद्दल मोठा अभिमान आहे. असे वाडेगव्हाण ग्रामस्थांनी सांगितले.

from https://ift.tt/3oi4Mew

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *