पारनेर : तालुक्यातील वडगाव सावताळ येथील ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक घोटाळा झाला असून या आर्थिक घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य संजय रोकडे यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात संजय रोकडे व ग्रामस्थांनी मागणी केली आहे कि, वडगाव सावताळ ग्रामपंचायतच्या जनरल खात्यामध्ये आर्थिक अफरातफर झाली असून याबाबत ग्रामसेवक यांना माहिती मागुनही ग्रामसेवक काही पदाधिकाऱ्यांच्या दबावाला बळी पडून माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहे तसेच विरोधी सदस्यांना विश्वासात न घेता कामकाज सुरु असून हेतुपुतस्कर विकासकामे करण्यास टाळाटाळ होत आहे.
वडगाव सावताळ येथील ग्रामपंचायत कारभाराची चौकशी करावी अन्यथा पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.
या निवेदनावर अर्जदार ग्रामपंचायत सदस्य संजय रोकडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आशाबाई सतीश तिखोळे ,जिजाबाई दादाभाऊ नऱ्हे ,देवक भीमा बर्डे ,माजी सरपंच राजेंद्र रोकडे ,सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष भाऊसाहेब खामकर आदींच्या सह्या आहेत.

from Parner Darshan https://ift.tt/3oigl4m

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *