नवी दिल्ली : लहान मुलांसाठी मोठी गुड न्यूज आहे. लवकरच तीन वर्षांवरील सर्व मुलांसाठी कोरोनाची कोवाव्हॅक्स ही लस येणार आहे. सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया पुढील सहा महिन्यांत मुलांसाठी लस कोवाव्हॅक्स लाँच करेल, अशी माहिती सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी दिली आहे.  
अदर पुनावाला यांनी आज (मंगळवारी) सीआयआय पार्टनरशिप समिटमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. सध्या तीन आणि त्याहून अधिक वयाच्या मुलांसाठी Covavax ची चाचणी सुरू आहे. Covavax ही यूएस-आधारित नोव्हावॅक्सच्या कोविड लसीचे व्हर्जन आहे. अशी माहितीही पुनावाला यांनी दिली.
“सध्या कोवाव्हॅक्सीनची चाचणी सुरू असून कोवाव्हॅक्स मुलांचे कोरोना विषाणूपासून पूर्णपणे संरक्षण करेल. ओमाक्रॉनचा मुलांवर कसा परिणाम होईल हे अद्याप माहित नाही. परंतु, कोरोनापासून मुलांचे संरक्षण करणे गरजेचे आहे,” असे पूनावाला यावेळी म्हणाले.
पूनावाला पुढे म्हणाले की, “आजपर्यंत लहान मुलांमध्ये कोरोनाचे फारसे गंभीर रुग्ण आढळून आलेले नाहीत. शिवाय मुलांमध्ये कोरोनाची कोणतीही भीती निर्माण झालेली नाही ही आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. आता आम्ही लवकरच मुलांसाठी कोविड-19 लस लाँच करणार आहोत. “
देशातील सर्वात मोठी कंपनी सीरम इन्स्टिट्यूट, पुणे यांनी कोवाव्हॅक्सच्या पहिल्या बॅचचे उत्पादन आधीच सुरू केले आहे. सीरम इन्स्टिट्यूटने ट्विट करून ही माहिती दिली होती आणि एक नवीन यश प्राप्त केल्याचे सांगितले होते. आम्ही नोव्हावॅक्सने तयार केलेल्या कोविड-19 लसीची पहिली खेप तयार करण्यास सुरुवात केली आहे, ज्याला कोवाव्हॅक्स नाव देण्यात आले आहे. अशी माहिती इन्स्टिट्यूटने दिली आहे.
दरम्यान, कोरोना महामारीसोबत देश दोन हात करत असताना आता लहान मुलांसाठी लस येणार असल्याची आनंदाची गोष्ट आहे. या आधी मागच्या महिन्यात भारतातील औषध नियामक प्राधिकरणाने 12 वर्ष व त्यावरील व्यक्तींच्या लसीकरणासाठी ‘जाइकोव्ह-डी’ लशीला मंजुरी दिली आहे. वय वर्ष 12 व त्यावरील व्यक्तीच्या वापरासाठी मंजुरी देण्यात आलेली ही पहिलीच लस आहे. केंद्र सरकारने ‘जाइकोव्ह-डी’ लशीचे एक कोटी डोस खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. एका डोसची किंमत कराशिवाय 358 रुपये आहे.
या किंमतीत 93 रुपयाच्या ‘जेट एप्लीकेटर’च्या खर्चाचा समावेश आहे. त्याच्या मदतीने लशीचा डोस देण्यात येणार आहे. सूत्रांनी सांगितले की, सध्याच्या मर्यादित उत्पादन क्षमतेमुळे ही लस सुरुवातीच्या टप्प्यात फक्त वयस्करांना देण्याची शक्यता आहे. ‘जाइकोव्ह-डी’ लशीचे एक कोटी डोस दरमहा उपलब्ध होतील अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सरकारला दिली.

from https://ift.tt/322KVro

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *