भारतरत्न, देशाच्या गानकोकिळा लता मंगेशकर आज काळाच्या पडद्याआड गेल्या. मात्र गेल्या 8 दशकांपासून त्यांच्या आवाजाच्या जादूचे सर्वजण चाहते होते. आज त्यांची काही लोकप्रिय गाणी पाहूयात…
● जब प्यार किया तो डरना क्या : मुगल-ए-आजम या सिनेमातील हे अतिशय लोकप्रिय गाणं आहे.

● भीगी भीगी रातों में : ‘अजनबी’ सिनेमातील हे गाणं लता मंगेशकर यांच्या सुपरहिट गाण्यांपैकी एक आहे.
● तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं : ‘आंधी’ सिनेमातील या गाण्याला लोकांची मोठी पसंती दिसून येते.
● जाने कैसे कब कहां इकरार : ‘शक्ति’ सिनेमातील या गाण्याला लोकांनी डोक्यावर घेतले होते.

● लग जा गले : ‘वो कौन थी’ सिनेमातील लता मंगेशकर यांचं हे गाणं चांगलं हिट ठरलं.
● एक प्यार का नगमा है : ‘शोर’ सिनेमातील हे गाणं आजही लोकांच्या खूप आवडीचं आहे.
● तूने ओ रंगीले : ‘कुदरत’ सिनेमातील या गाण्याला आजही आठवले जाते.

● माई नी माई : ‘हम आपके हैं कौन’ या सिनेमातील हे गाणं फार लोकप्रिय झालं होतं.
● दिल तो पागल है : ‘दिल तो पागल है’ या सिनेमाचं हे टायटल ट्रॅक होतं.
● मेरे ख्वाबों में जो आए : ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ मधील हे हिट गाणं आजच्या तरूणाईला देखील फार आवडतं.
“वो कौन थी? ” या हिंदी सिनेमातील लता मंगेशकरांचे ‘लग जा गले’ हे गाणे माझ्या मनाला भावले. त्यांच्या निधनाने आज हूरहूर वाटते. परिवारातील एखादी व्यक्ती गेली असेच दु:ख झाले असून संगीत क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित पाटील झावरे यांनी दिली.

from https://ift.tt/d4A20yt

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *