
पारनेर : अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे, न्यू आर्टस्, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज,पारनेर महाविद्यालयातील श्रीमती रोहिणी दिघे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ७३ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात गुणवंत शिक्षकेतर सेवक पुरस्कार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ दरवर्षी वर्धापनदिनानिमित्त विविध पुरस्कारांचे वितरण करत असते. यावर्षीचा शिक्षकेतर सेवक पुरस्कारासाठी रोहिणी दिघे यांची निवड करण्यात आली. रोहिणी दिघे या पारनेर महाविद्यालयात गेली पंधरा वर्षापासून काम करत असून सध्या त्या वरिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत आहेत. रोहिणी दिघे यांचा सामाजिक क्षेत्रातील कार्यक्रमांमध्ये सातत्याने उत्स्फूर्त सहभाग असतो. तसेच विविध राज्यस्तरीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तसेच फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये सहभाग असतो. त्यांनी केलेल्या वैविध्यपूर्ण कामाची दखल घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्यांना गुणवंत शिक्षकेतर सेवक पुरस्कार देऊन सन्मानित केले.
या पुरस्कारासाठी पुणे, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील जवळपास ५० हून अधिक प्रस्ताव विद्यापीठास प्राप्त झाले होते. यातून श्रीमती रोहिणी दिघे यांची निवड झाली.
श्रीमती दिघे यांच्या यशाबद्दल अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे, उपाध्यक्ष रामचंद्र दरे,सचिव जी. डी. खानदेशे, सहसचिव विश्वासराव आठरे पाटील, खजिनदार डॉ.मुकेश मुळे, ज्येष्ठ विश्वस्त सिताराम खिलारी, पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य राहुल झावरे , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रंगनाथ आहेर, उपप्राचार्य डॉ.दिलीप ठुबे,कार्यालयीन अधिक्षक बाळासाहेब गिरी यांनी अभिनंदन केले.
from https://ift.tt/wyxFSkf