रावणाने मंदोदरीला स्त्रियांबद्दल सांगितलेले अवगुण कोणते?

 

Table of Contents

लंकपती रावणाने कठोर तपश्चर्या करून बरेच ज्ञान प्राप्त केले होते. त्याचे आपली पत्नी मंदोदरीवर अतोनात प्रेम होते. रामचरित मानसानुसार, रावणाने सीतेचे हरण केल्यावर, प्रभू श्रीराम लंकेला पोहोचल्यावर मंदोदरी घाबरुन गेली होती. या दरम्यान तिने रावणाला श्रीरामाकडे शरण जाऊन लढाई न करण्यास सांगितले. मात्र हे ऐकून रावण हसला आणि त्याने स्त्रियांच्या आठ अवगुणांचे वर्णन केले. यावेळी रावणाने सांगितलेल्या अवगुणांबद्दल आज जाणून घेऊयात…

 

● स्त्रिया अनेकदा नको त्या ठिकाणी साहस दाखवतात . यामुळे नंतर स्वतःला आणि कुटुंबीयांना याची खंत वाटते.
● स्त्रिया अनेक ठिकाणी खोटं बोलतात. मात्र त्यांना हे माहित नाही की, खोटं फार काळ लपत नाही.
● स्त्रीयांचे मन चंचल असल्याने ते पुन्हा-पुन्हा बदलत राहते. जे समजणे अतिशय कठीण आहे.
● परिस्थिती अनुकूल व्हावी यासाठी अनेकदा स्त्रिया इतरांविरूद्ध कट रचतात.

 

● बऱ्याच महिला घाबरट असतात. त्यांच्या मतानुसार काम झाले नाही की, त्या त्यात बदल करतात.
● महिला थोड्या मुर्ख देखील असतात. त्या विचार न करता निर्णय घेतात आणि मोठ्या अडचणीत येतात.
● रावणाच्या म्हणण्यानुसार स्त्रिया निर्दयी असतात. जर त्यांनी दयाभाव सोडला तर कधीच दया दाखवत नाहीत.
● स्त्री कितीही सुंदर दिसत असली तरी ती स्वच्छतेची काळजी घेत नाही. म्हणून रावणाने महिलांना अपवित्र म्हटले आहे.

from https://ift.tt/3oGTG1K

Leave a Comment

error: Content is protected !!