मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळेच चिंतेत वाढ झाली आहे. आरोग्य विभाग, टास्क फोर्स यांच्यातील झालेल्या बैठकीनंतर राज्यात निर्बंध लावण्यात आले आहेत. आजपासून निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम आणि लग्नसोहळे फक्त 50 लोकांच्या उपस्थितीत करता येणार आहेत. तर अंत्यसंस्कारासाठी 20 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. पर्यटनस्थळावर जमावबंदी लागू कऱण्यात आली आहे. स्थानिक प्रशासनाला कडक निर्बंध लावण्याची मुभा देण्यात आली आहे. 
सरत्या वर्षाला निरोप देण्याची तयारी सुरू असताना दुसरीकडे कोरोनाने नागरिकांची चिंता वाढवली आहे. मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची वाढ होऊ लागली आहे. ओमायक्रॉनबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने प्रशासनाच्या चिंतेत आणखीच भर पडली आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्याची तयारी सुरू असताना दुसरीकडे कोरोनाने नागरिकांची चिंता वाढवली आहे. मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची वाढ होऊ लागली आहे. ओमायक्रॉनबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने प्रशासनाच्या चिंतेत आणखीच भर पडली आहे. त्यामुळे गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर राज्यात निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 📌 काय आहेत नवे निर्बंध?
▪बंदिस्त हॉल किंवा रिकाम्या जागेतील लग्न संमारंभासाठी फक्त 50 लोकांच्या उपस्थितीला परवानगी
▪सर्व प्रकारचे सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी मग ते बंदिस्त हॉल किंवा रिकाम्या जागी असतील, अशा कार्यक्रमांना 50 लोकांच्या उपस्थितीची परवानगी
▪अंत्यविधीसाठी 20 लोकांच्या उपस्थितीची परवानगी
▪पर्यटन स्थळे, समुद्र किनारे, रिकामी मैदाने आदी ठिकाणी कलम 144 लागू
▪परिस्थिती पाहून स्थानिक प्रशासनाला कडक निर्बंध लावण्याची मुभा
▪यापूर्वी राज्य सरकारकडून घालण्यात आलेले अन्य निर्बंध कायम राहतील.

🔸 गर्दी टाळण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आवाहन
31 डिसेंबरच्या अनुषंगाने आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर इतकंच सांगेन की, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. नवीन वर्ष कोरोनापासून मुक्ती असणारं वर्ष असावं अशी सदिच्छा व्यक्त करतो. असं सांगत असतानाच गर्दी टाळावी, संसर्ग होईल असं कुठलंही कार्य करू नका. कोरोना नियमावलीचं पालन करा, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना केले.
🔸 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाबाबतही निर्णय
लसीकरणाबाबत बोलताना टोपे म्हणाले की, केंद्र सरकारने 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या वयोगटाच्या शाळा सुरु ठेवल्या पाहिजेत. त्यांचे शाळेत लसीकरण न करता लसीकरण केंद्रावर घेऊन जाऊन, टप्प्याटप्प्याने करावे याबाबत चर्चा झाली. तर अद्याप लस न घेतलेल्या लोकांचे लसीकरण तातडीने झाले पाहिजे, असा निर्णयही घेण्यात आला आहे. त्याबाबत प्रशासनाची दोन दिवसांत बैठक घेतली जाईल. जे जिल्हे लसीकरणात मागे आहेत त्यांना सूचना केल्या जाणार आहेत.

from https://ift.tt/3zc51vJ

By News

Leave a Reply

Your email address will not be published.