पारनेर : ‘एक ग्लास रस द्या, ज्यादा बर्फ टाकू नका…’ हे वाक्य तापत्या उन्हात बाहेर पडणाऱ्यांचे, ऊसाच्या रसवंतीगृहाचे! कडक उन्हाळा सुरू व्हायला अद्याप काही दिवसांचा अवकाश असला तरीही आत्ताच पारा २७ अंश सेल्सियसमध्ये गेला आहे.त्यामुळे गेली दोन वर्ष कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमध्ये बंद असलेली ऊसाच्या रसाच्या यंत्राची चाके यंदा पुन्हा फिरली असून घुंगराच्या छनछनाटात फिरत्या चाकांवरती ‘गोडवा’ देणारा हा व्यवसाय नव्याने सुरू झाला आहे.
उन्हाळ्यात उसाचा ताजा व थंड रस पिण्याचा आनंद वेगळाच असतो. उन्हाळ्यात हा उसाचा रस पिल्याने शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते व डीहायड्रेशनपासून बचाव होतो. शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. मात्र, कोरोना विषाणू संसर्गामुळे राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील रसवंतीगृहांची घुंगरे गेली दोन हंगाम खळखळलीच नव्हती. याचा फटका शेतकरी, छोटे व्यावसायिक, मजुरांना बसला होती. लॉकडाउनच्या झळा शहरापासून गावगाड्यापर्यंत सगळ्यांनाच बसलेल्या होत्या. यातून रसवंतीगृहसुद्धा सुटलेले नव्हते. परंतू शासनाने निर्बंध शिथील केल्याने उन्हाळ्यात शहरापासून ते गाव, वाडी-वस्तीवर रस्त्याच्या कडेला असणारी रसवंतीगृह पुन्हा सुरू झाली आहेत.त्यामुळे रस काढण्याच्या यंत्राला बांधलेली घुंगरे यावर्षी खळखळली आहेत.गेल्या दोन वर्षापासून घुंगरांचा बंद झालेला आवाज यावर्षी पुन्हा ऐकायला मिळत आहे.
उन्हाळ्याची चाहूल लागली की, गावात रस्त्याच्या बाजूला रसवंतीगृहाच्या घुंगरांचा खुळखुळ आवाज घुमू लागतो. रस्त्यावरून ये-जा करणारे सर्वजण कुटुंबासह लिंबू व आले घातलेल्या उसाच्या रसाचा आस्वाद घेतात. ग्रामीण व शहरी भागासाठी हंगामी पण कमी भांडवलात करता येणारा आणि चांगले उत्पन्न देणारा हा व्यवसाय आहे. उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असताना प्रत्येक जण काहीतरी थंड पिण्यास पसंती देतो. त्यातच आरोग्यदायी उत्तम पेय म्हणून उसाच्या रसाला सर्वजणच पसंती देतात. अगदी गजबजलेल्या शहरापासून ग्रामीण भागातील वाडी-वस्तीवर रस्त्याच्या कडेला असणारी ही रसवंतीगृहे उन्हाळ्यात हजारो-लाखो लोकांची तहान भागवतात. इतर कोणत्याही शीतपेयापेक्षा उसाचा रस आरोग्यदायी असल्याने सर्वांची याला पसंती असते. फेब्रुवारी महिन्यापासून रसवंती व्यवसाय सुरू होतात. यानंतर मार्च, एप्रिल, मे आणि जूनमध्ये या व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल होते. रसवंती व्यवसायातून रसवंती मालक, काम करणारे मजूर, तसेच ऊस उत्पादक शेतकरी यांना मोठा फायदा होतो.
कोरोना विषाणू संसर्गामुळे हा व्यवसाय बंदच होता. याचा फटका या व्यवसायालाही बसला होता. दोन वर्ष हंगाम वाया गेल्याने सर्वसामान्य शेतकरी, मजूर, व्यावसायिक यांची आर्थिक घडी विस्कळित झाली होती.चांगल्या उत्पादनाच्या आशेने अनेक शेतकरी शेतात रसवंतीसाठीचा ऊस लागवड करतात.
नवनाथ रसवंतीच्या नावाचे रहस्य सांगताना जूने रसवंती चालक सांगतात की ,ऊसाच्या रसाला रसवंतीच्या माध्यमातून कमर्शियल स्वरूप दिले ते पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील बोपगाव इथल्या शेतकऱ्यांनी. बोपगावात नवनाथांपैकी एक असलेले कानिफनाथांचे गुहेमध्ये मंदिर आहे. आपल्या गावाची ओळख, श्रद्धास्थान असलेल्या नवनाथांचे रसवंतीला नाव दिले जाते तर शेतकऱ्याला मदत करणाऱ्या बैलांची सतत आठवण राहावी यासाठी बैलाच्या गळ्यातील घुंगरमाळेतील घुंगरं रसाच्या चरख्याला बांधत असल्याचे सांगितले.
▪ऊसाच्या रसाचे ‘असे’आहेत फायदे !
स्किनसाठी उत्तम – अल्फा हाइड्रोक्सी एसिड आणि ग्लायकोलिक ऍसिडने भरपूर ऊस स्किनसाठी अमृता सामान आहे. यामुळे पिंपल्स दूर होतात बलकी चेहर्‍यावरचे डाग दूर होतात, वय वाढणे थांबत आणि स्किनला हायड्रेटेड ठेवण्यात मदत मिळते.
डीहायड्रेशन पासून बचाव – उन्हाळ्यामुळे डीहायड्रेशनची भिती सतत असते. कॅल्शियम, मॅग्नीशियम, पोटॅशियम, आयरन आणि मॅगनीजने भरपूर उसाचा रस इलेक्ट्रोलाइट्स आणि पाण्याची कमतरता पूर्ण करतो.
ऊर्जेचा उत्तम स्रोत – यात ग्लूकोजची अधिक मात्रा असते. ग्लूकोज आणि इतर इलेक्ट्रोलाइट्स याला एक उत्तम एनर्जी ड्रिंक बनवतात. यामुळे तुम्हाला फक्त ऊर्जाच मिळत नाही बलकी उन्हापासून बचाव करून शरीराला शांत ठेवण्यात देखील मदत मिळते.
तोंडातील दुर्गंधीपासून मुक्ती मिळते – मिनरल्स, पोटॅशियम आणि नेचरमध्ये ऐल्कलाइन असल्यामुळे उसाच्या रसाचा एंटीबॅक्टीरियल प्रभाव पडतो. यामुळे दातांना इन्फेक्शनपासून बचाव आणि त्यांना निरोगी ठेवण्यास मदत मिळते.
किडनीसाठी उत्तम – प्रोटिनाने भरपूर उसाचा रस किडनीचे उत्तमरीत्या काम करण्यास मदत करतो. नेचरमध्ये ऐल्कलाइन असल्याशिवाय हे एक चांगले एंटीबायोटिक एजेंट आहे. एवढंच नव्हे तर युरीनमध्ये होणारी जळजळ देखील कमी करतो.

डायबिटीजच्या रुग्णांसाठी उत्तम – जर तुम्हाला असे वाटत असेल की उसाचा रस डायबिटीजच्या रुग्णांसाठी उत्तम राहत नाही तर तुम्ही चूक आहात. यात ग्लूकोज असला तरी यात कमी प्रमाणात ग्लाइसेमिक इंडेक्सपण असतो.
एक शक्तिशाली एंटीऑक्सीडेंट- अध्ययनानुसार, यात उपस्थित यौगिक फक्त फ्री रॅडिकल्सला स्वच्छ करतो बलकी आयरनचे उत्पादन कमी करण्यास सहायक असतो. त्याशिवाय याचे लिपिड परऑक्सीडेशन थांबवण्यात सहायक आहे.
कॅन्सरशी लढतो – एंटीऑक्सीडेंटने भरपूर उसाचा रस शरीरावर शक्तिशाली प्रभाव पाडतो. एका अध्ययनानुसार, यात उपस्थित फ्लेवोन कॅन्सर कोशिकांनाच्या प्रसार आणि उत्पादनाला थांबवण्यासाठी प्रभावी असतो.
रसवंतीगृह हा आमचा पारंपारिक व्यवसाय मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे लॉकडाऊन झाल्याने बंद होता.
यावर्षी व्यवसाय सुरू झाल्याचे समाधान आहे.ग्राहकांचीही ऊसाच्या रसाला पसंती लाभत आहे, उसाच्या दरात वाढ झाली आहे.मात्र आम्ही रसाचे दरात वाढ न करता ते दर पूर्वीप्रमाणेच ठेवले आहेत.
संतोष चेमटे
नागेश्वर रसवंती गृह,भाळवणी

from https://ift.tt/82o4SZt

By News

Leave a Reply

Your email address will not be published.