
दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा देव, सुपरस्टार अर्थात ‘रजनीकांत’ यांचा आज वाढदिवस. यानिमित्त त्यांच्या जीवनातील तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी जाणून घेऊयात…
● रजनीकांत यांचा जन्म 12 डिसेंबर1950 ला बंगळुरू या ठिकाणी झाला. जिजाबाई आणि रामोजीराव यांच्या 4 मुलांमध्ये रजनीकांत सर्वात लहान होते.
● ते 5 वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. यानंतर घर चालविण्यासाठी त्यांनी कुलीचेही काम केले.
● त्यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड आहे. सुपरस्टार होण्यापूर्वी त्यांनी काही दिवस बस कंडक्टर म्हणून देखील काम केले आहे.
● अभिनेता बनण्याचे स्वप्न रजनीकांत यांना त्यांचे मित्र राज बहादूर यांच्याकडून मिळाले होते.
● बालचंद्रच्या ‘अपूर्व रागनाल’ या चित्रपटाद्वारे त्यांनी तमिळ चित्रपटसृष्टीत एन्ट्री केली.
● अभिनयाची सुरूवात त्यांनी कन्नड नाटकांमधून केली. तर दुर्योधनच्या भूमिकेत ते खूप लोकप्रिय झाले.
● अनेक नकारात्मक भूमिकांमध्ये अभिनय केल्यानंतर ते प्रथमच एसपी मुथुरामन यांच्या चित्रपटात नायकाच्या भूमिकेत दिसले.
● त्यांना ‘बिल्ला’ या चित्रपटातून पहिले व्यावसायिक यश मिळाले. 1978 मध्ये हा चित्रपट अमिताभ बच्चन अभिनीत डॉन बिल्लाचा रिमेक होता.
● त्यांनी प्रथमच ‘मुंदरू मुगम’मध्ये तिहेरी भूमिका साकारली. यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
● टी रामारावचा यांचा ‘अंधा कानुन’ हा चित्रपट रजनीकांतचा पहिला हिंदी चित्रपट होता.
● त्यांनी 1985 मध्ये 100 चित्रपट पूर्ण केले. श्री राघवेंद्र हा रजनीकांत यांचा 100 वा चित्रपट होता.
वास्तवाचे भान ठेवून, कायम जमिनीवर पाय घट्ट रोवून उभा असलेला कलाकार जीवनात स्वतःचे वय आणि डोक्यावरचे टक्कल कधीही लपवत नाही. या अस्सल कलाकाराला जन्मदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात…
from https://ift.tt/31TSuQS