
नवी दिल्लीः शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी संसदेच्या संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. आता प्रियांका चतुर्वेदी यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे आज (रविवारी) चर्चेत आल्या आहेत. प्रियांका चतुर्वेदी यांनी संसद टीव्हीवरील एका कार्यक्रमाच्या अँकर पदाचा राजीनामा दिली आहे. याचे कारणही प्रियांका चतुर्वेदी यांनी सांगितले आहे.
प्रियांका चतुर्वेदी यांनी आपल्या राजीनाम्यासंबंधी राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिले आहे. राजीनामा देताना खूप वाईट वाटतंय. पण संपूर्ण विचार करून संसद टीव्हीवरील शो ‘मेरी कहाणी’ च्या अँकर पदाचा राजीनामा देऊ इच्छिते, असे प्रियांका चतुर्वेदी यांनी पत्रात म्हटले आहे.
राज्यसभेतून आपल्याला निलंबित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर संसद टीव्हीवरील ‘मेरी कहाणी’ या शोच्या अँकर पदवार कायम राहण्याची आपली तयारी नाही. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राज्यसभेत जो गदारोळ झाला त्यावरून १२ खासदारांना निलंबित करण्यात आले. असभ्य वर्तनाबद्दल करण्यात आलेली ही निलंबनाची कारवाई संसदेच्या इतिहासात कधीच झालेली नाही. यामुळे आता आपल्याला त्याविरोधात बोलण्यासाठी आणि एकजुटीने उभे राहण्याची गरज आहे. तसेच आम्ही १२ खासदार निलंबनाची ही कारवाई कधीच विसरणार नाही, असे प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या.
आपल्याला पात्र समजून दिलेल्या जबाबदारीबद्दल राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची आभारी आहे, असे प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी राज्यसभेत गदारोळ आणि गैरवर्तन केल्याच्या आरोप प्रकरणी विरोधी पक्षांच्या १२ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.
from https://ift.tt/3xV8Api