”या” महाराजांनी लावला जावई शोध ! म्हणे,कोरोनाने मेले ते डॉक्टरांनीच मारले !

 

Table of Contents

सांगली :कोरोना म्हणजे फर्जीवाडा असल्याची मुक्ताफळे येथे उधळली. इतकेच काय कोरोनाचे मृत्यू म्हणजे डॉक्टरांनी लोकांना मारले. त्यांच्या किडनी आणि अवयवांची तस्करी केली, असा जावई शोध कालीपूत्र कालीचरण महाराज यांनी लावला आहे.कोरोना एक षडयंत्र आहे. तो फर्जीवाडा आहे इतकंच नाहीतर जागतिक आरोग्य संघटना पण फर्जीवाड आहे, असा दावा त्यांनी केला आहे. ते सांगलीत बोलत होते.करोना ही भयानक महामारी नाही. ज्या करोनामुळे लोकांचा मृत्यू झाला, त्या लोकांना डॉक्टरांनी मारलं आहे. त्यांच्या शरीरातील किडनी आणि मानवी अवयवांची तस्करी झाली आहे, असा धक्कादायक आरोपही त्यांनी केला.
कालीचरण महाराज म्हणाले, भारतातील प्रजेने ईश्वरनिष्ठ होऊन आयुर्वेदाचे उपचार घ्यावेत. सगळे कोरोने-फिरोने फेल होतील. कशाकाय यांना भविष्यवाण्या सूचतात हो, असे ते म्हणालेत.तिसरी लाट येऊन राहिलीय.त्यांच्या कंपन्या आहेत व्हॅक्सीनच्या. त्या तिसऱ्या लाटेच्या नावाखाली धडाधड व्हॅक्सीन बनवतात आणि त्या खपवतात. दुसरं काय हाय? हा कोरोना म्हणजे एक मोठे षढयंत्र आहे, असा दावा कालीपूत्र कालीचरण महाराज यांनी केला आहे.
लोकांना मारणं सुरू आहे. त्यांचे मृतदेह लपेटून टाकून दिले जात आहेत. त्यांच्या किडन्या काढल्या, हार्ट काढले, डोळे काढले काय माहित. लोकांना मारून फेकत आहेत, असेही ते म्हणालेत.दरम्यान, ओमिक्रोननं पुन्हा एकदा जगाची चिंता वाढवली असताना ओमिक्रोनचा प्रसार अत्यंत वेगानं होत असल्याचे समोर आलेय.
नव्याने ओमिक्रोन आढळलेल्या देशाची यादी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.आतापर्यंत जवळपास दीड डझन देशात ओमिक्रोनच्या नव्या विषाणुचा प्रसार झालाय. सुरूवातीला फक्त दक्षिण अफ्रिकेत आढळेला ओमिक्रोन आता 16 देशात आढळून आल्याची नवी यादी समोर आली आहे.

from https://ift.tt/3daUOFs

Leave a Comment

error: Content is protected !!