
भारतीय मधुमेह महासंघाच्या माहितीनुसार, भारतात सुमारे 7 कोटी लोकं मधुमेह या आजाराने ग्रस्त आहेत. दरम्यान रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने अंधुक दिसणे, जास्त थकवा येणे, चिडचिडेपणा यासारख्या समस्या सामान्य होतात. त्यामुळे मधुमेह पातळी वाढण्यापूर्वी त्यावर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत खालील काही उपायांनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येते. त्यावर एक नजर टाकुयात..
● जर तुम्ही तुमच्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वेळेवर तपासली नाही, तर साखरेच्या पातळीचे चढउतार दिसत नाहीत. त्यामुळे दिवसातून चार वेळा साखरेची पातळी तपासा.
● मधुमेही रुग्णांना व्यायाम करायला हवा मात्र कारण काढून ते टाळा-टाळ करतात. त्यामुळे नियमित व्यायाम करा.
● मधुमेहामध्ये स्नायू तयार करणे महत्वाचे आहे. त्यामुळे लोकं त्यांच्या स्नायूंच्या प्रशिक्षणात अधिक व्यायाम करण्यास सुरुवात करतात. मात्र अधिक व्यायाम करताना शरीराची काळजी घ्या.
● व्यायामादरम्यान स्नायूंवर येणारा ताण दूर करण्यासाठी, पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक आहे. मात्र जर तुम्ही व्यायामानंतर शरीराला आराम करण्याची संधी दिली नाही तर ते शरीराला हानी पोहोच शकते.
● मधुमेहाच्या रुग्णांनी हिरव्या भाज्यांचे सेवन करायला हवे. कारण त्यामध्ये व्हिटॅमिन्स, बीटा कॅरोटीन आणि मॅग्नेशियम चांगल्या प्रमाणात असतात. याने साखरेची पातळी संतुलित राहते.
from https://ift.tt/31w8iZU