तुम्ही कधी उन्हाचा अथवा स्वतःच्या सावलीचा टॅक्स भरलेले ऐकले आहे का ? नाही ना. मात्र हे खरे आहे. अनेक देशात उन्हापासून ते स्वतःच्या सावलीचा देखील टॅक्स वसूल केला जातो. चला, तर त्याबद्दल अधिक सविस्तर जाणून घेऊयात… 
● अमेरिकेच्या ऑर्कन्स राज्यात शरीरावर टॅटू गोंदवण्यासाठी 6 टक्के एवढा कर मोजावा लागतो.
● इटलीमधील वेनेटो शहरात कॉनेग्लियानो नावाचे एक ठिकाण आहे. तेथे हॉटेल, रेस्टॉरंट णि दुकानाच्या बोर्ड अथवा टेंटमुळे रस्त्यावर सावली पडते. त्याचा एक वर्षांसाठी 100 डॉलर टॅक्स वसूल केला जातो.
● स्पेनच्या बॅलरिक द्वीपावर 2016 पासून उन्हाचा टॅक्स (सन टॅक्स) आकारला जात आहे.

● अमेरिकेत 2010 पासून टेनिंग टॅक्स घेतला जात आहे. हा टॅक्स घेण्याचा उद्देश म्हणजे स्कीन कॅन्सर रोखण्यास मदत होईल.
● ओल्ड स्टफ मॅगझीननुसार, हंगेरीमध्ये 2011 पासून डब्बाबंद अन्नावर टॅक्स वसूल केला जातो. या अन्नामध्ये मोठ्याप्रमाणात साखर आणि मीठ असते. अधिकृतरित्या या टॅक्सला पब्लिक हेल्थ प्रोडक्ट टॅक्स म्हटले जाते.
● अमेरिकेच्या अलबामा येथे पत्त्यांचा बंडल खरेदी करताना टॅक्स आकारला जातो. अशाप्रकारे टॅक्स गोळा करणारे te एकमेव राज्य आहे.
● न्युयॉर्क टाईम्सनुसार, जापानमध्ये मेटाबो कायद्यानुसार, 40 ते 75 वर्षांच्या नागरिकांची कंबर दरवर्षी मोजावी लागते. पुरूषांच्या कंबरे लांबी 85 सेंटीमीटर पेक्षा जास्त आणि महिलांची 90 सेंटीमीटर पेक्षा अधिक असेल तर त्यांना टॅक्स द्यावा लागतो.

from https://ift.tt/3FjzCcP

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *