सध्या उस्मानाबादमध्ये राष्ट्रपती आणि पंतप्रधान या नावावरूनच चर्चा रंगलीय. त्याच कारण जाणून तुम्ही हैराण व्हाल हे नक्की… 
त्याचे झाले असे कि, उस्माबादच्या उमरगा तालुक्यातील चिंचोली गावातील दत्ता चौधरी यांनी आपल्या मुलांची नावे राष्ट्रपती आणि पंतप्रधान अशी ठेवली आहे. आपल्या मोठ्या मुलाचं नाव राष्ट्रपती तर लहाण्याचे नाव पंतप्रधान ठेवले आहे. त्यांनी आपल्या मुलांची अजब नावं ठेवत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
सर्वसाधारणपणे पालकांचा मुलांची नाव ठेवण्याचा कल राजकीय नेतेमंडळी, अभिनेते, अभिनेत्री यांच्या नावावरून असतो. मात्र दत्ता आणि कविता चौधरी यांनी आपल्या मुलांची नावं वेगळीच ठेवण्याचा निर्णय घेतला. नावाचा मुलांच्या कर्तृत्वावर प्रभाव पडतो. त्यामुळे माझ्या मुलांवर चांगले संस्कार करुन त्यांना नावाप्रमाणे बनवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं दत्ता चौधरी यांनी बोलताना सांगितलं.
हल्ली नव्यानं जन्मलेल्या बाळांची हटके नावं ठेवण्याचा ट्रेंड सुरू असला तरी पण चौधरी कुटुंबानं मुलांची नावं राष्ट्रपती आणि पंतप्रधान अशी ठेऊन नवा पायंडा पाडला आहे.

from https://ift.tt/3p1gQA5

By News

Leave a Reply

Your email address will not be published.