सरासरी प्रापंचिक जबाबदारी वाढत चालली असताना वयही वाढत असतं.कुटुंबातील सर्वांच्या गरजा पुर्ण करून समाजात आपली पत निर्माण करताना किंमतही वाढावी ही अपेक्षा साधारण असतेच.पण प्रत्येकाला हे जमेलच असं नाही. त्यासाठी कुलाचार अत्यंत महत्त्वाचा आहे. दानधर्म करणे,दुसऱ्यांना मदत करणे,त्यांचं दुःख पाहूनं कणव,दया निर्माण होणे, शेजारधर्म पाळणे,प्रसंगी स्वार्थ त्यागता येणे ही काही सात्विक कुलाचाराची मुख्य लक्षणं आहेत.
ही लक्षणे आपल्या कुळपरंपरेत असतील तर मानसिक विकार आपल्या वाट्याला चुकुनही येणार नाहीत.
कुलाचार दोषाने मनोकामनेत वारंवार अधःपतनाचे प्रसंग घडु लागले की मानसिक असंतुलन तयार होते.असंतुलन तयार करणारे काही कुलदोष…
सतत काहीतरी मिळवण्याचा हव्यास,शेजाऱ्यांच्या प्रगतीने अस्वस्थता निर्माण होणे,त्याच्या प्रपंचात विघ्न निर्माण करण्यासाठी खटपट करणे,कष्ट न करता धन मिळवण्यासाठी अघोरी कर्मकांडात अडकणे,कुणालाही मदत न करण्याचा स्वभाव,उलट एखादा अडचणीत असल्याचे कळाल्यावर त्याला लुटता कसे येईल याचा प्रयत्न करणे,स्वतःचा सन्मान वाढवण्यासाठी दुसऱ्यांचा अवमान करणे.अशा अनेक विनाशक गोष्टी मनुष्य कुलाचार दोषाने करतो.
मागील कुळातील गुणदोष पुढच्या पिढीत संक्रमीत होत असतात.दुर्दैवाने मित्रपरिवारही तसाच मिळत जातो.मग आनंद मिळण्याच्या वाटा बंद होतात.दुसऱ्याचं वाटोळं करणे हाच एकमेव अघोरी आनंद मिळवण्याचा मार्ग शिल्लक रहातो.परंतु वयपरत्वे शक्तिपात होत जातो आणि विघातक कारवाया करण्याचं बळही.अशा परिस्थितीत मानसिक संतुलन ढासळते.असुरक्षितेची भावना निर्माण होते.कितीही ठरवलं तरी हसताच येत नाही.हे सारं कुलाचाराशी निगडित असलं तरी सज्जनांची संगत आपल्या जीवनात खरा आनंद आणु शकते.
संत निळोबाराय म्हणतात,घडो त्यांचा समागम।ज्यांचे प्रेम विठ्ठली।।सहज त्यांच्या ऐकता गोठी।परमार्थ पोटी दृढावे।।
त्यांचाच सहवास मिळावा किंवा त्यांच्याशीच मैत्री व्हावी ज्यांचं विठ्ठलावर प्रेम आहे,त्यांच्याशी सहज गप्पागोष्टी केल्या तरी परमार्थ अंगात शिरतो.म्हणजे आवडीचा पदार्थ खाल्ल्यावर जशी तृप्ती अनुभवता येते तीच अवस्था आनंदाने पोट भरण्याची आहे.त्यांच्या सहवासाने परमार्थ दृढ होतो असं निळोबाराय म्हणतात.हे कृपासाध्य असलं तरी काही अंशी प्रयत्नसाध्य आहेच.कुलिनता त्याग वृत्तीनेच श्रेष्ठ ठरते.

 

तुकोबाराय म्हणतात,
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक।तयाचा हरिख वाटे देवा।।
कुळ ,सात्विकता आणि आनंद यांचं अतुट नातं आहे.
मानसिक तंदुरुस्ती म्हणजे आनंदी जीवन.ज्या घरातली गृहलक्ष्मी सतत हसतमुख असेल आनंदी असेल तर समजावं हा परिवार श्रेष्ठ कुलाचाराचा आनंद घेत आहे.जय जय रामकृष्णहरी

from https://ift.tt/3FPz2Ds

By News

Leave a Reply

Your email address will not be published.