म्हशींसाठी चक्क गोठ्यातच उभारला स्विमिंग टॅंक !

Table of Contents

आटपाडी : एकाच जागेला बंदिस्त राहणे कोणालाच आवडत नाही. त्याचा शरीरावर प्रतिकूल परिणाम होतो. तो ओळखूनच चिंचाळेचे उद्योजक शेतकरी माणिकराव गायकवाड यांनी डोंगरावर मुरा म्हशीचा अद्ययावत सोयी सुविधा युक्त मुक्त गोठा उभारला आहे. त्याला पाच वर्षे झाली असून मुक्त गोठा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यांच्यासाठी स्विमिंग टॅंक एक आकर्षणच होय.
चिंचाळेचे (ता. आटपाडी) गायकवाड यांचा गलाई व्यवसाय आहे. व्यवसायानिमित्त ते बाहेर असतात. गावाकडे शेतीवाडी आहे. त्यांना शेतीची आवड होती. त्यांनी गावात उंच टेकडीवर १५ एकर माळरान जमीन विकत घेऊन विकसित केली आहे. तेथे दोन एक एकरात मुरा म्हशीचा मुक्त गोठा उभारला आहे. इतर क्षेत्रात जनावरांसाठी विविध चारा, ऊस, साग याची लागवड केली आहे. पाच वर्षांपूर्वी चार मुरा म्हशीपासून सुरू केलेल्या मुक्त गोठ्यात आज बावीस मुरा म्हशी आहेत.
कोणालाच एकाच जागी बंदिस्त राहू वाटत नाही. त्याचा परिणाम शरीरावर होतो. याला जनावरही अपवाद नाहीत. याचा विचार करून माणिकराव यांनी मुरा म्हशीसाठी मुक्त गोठा उभारला. दोन एकर क्षेत्राला चारही बाजूने बंदिस्त कंपाऊंड केले. आत ऊन, पाऊसपासून संरक्षणासाठी निवारा उभारला. तेथे जनावरांना बसल्यानंतर जखमा होऊ नयेत यासाठी बसण्यासाठी खाली माट, चारा आणि पाण्याचे स्वतंत्र हौद, धुण्यासाठी शॉवर, पंखे बसवलेत.
बाहेरच शेतीचे खराब झालेल्या अवजारातून जुगाड अवजारांची निर्मिती केली आहे.ज्वारी, बाजरी, मका आणि गहू स्वस्त झालेल्या काळात मोठ्या प्रमाणात खरेदी करून जनावरासाठी लागणारे धान्य तयार केली जाते. त्यामुळे खर्चात बचत होते. कडबाकुटीच्या सहाय्याने चारा बारीक केला जातो. पाच गुंठ्यात पाण्याचा स्विमिंग टॅंक बांधला आहे. यात सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत म्हशी मनसोक्त पोहण्याचा आस्वाद घेतात. दर आठवड्याला त्यांचे पाणी बदलून शेतीला खत म्हणून वापरले जाते. प्रत्येक म्हशीला स्वतःचा कोड नंबर आहे. दर आठवड्याला ट्रॅक्‍टरच्या साह्याने शेण गोळा केलले जाते. देखरेखीसाठी सी. सी. टी.व्ही. बसवला आहे.
“एका जागेला जनावरे बांधल्यामुळे एवढेच नाही तर स्विमिंग टॅंकमधील पाणी आठ दिवसांला बदलले नाही तर दुधावर परिणाम होतो हे आम्ही अनुभवले आहे. मुक्त जनावरांच्या गोठ्यामुळे दूध उत्पादनात चांगली वाढ होते. दूध आणि खतापासून मेंटेनन्स खर्च भागतो. मुरा म्हशीची रेडी सांभाळून मोठी करून लाखांच्या दरम्यान विकतो. तेच उत्पन्न राहते.”
माणिकराव गायकवाड (शेतकरी).

from Parner Darshan https://ift.tt/3Ci8atH

Leave a Comment

error: Content is protected !!