
मुंबई : टेलिव्हिजनवरील लोकप्रिय शो म्हणून ‘होम मिनिस्टर’ गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमात दिवाळी विशेष भाग सुरु आहे. याच विशेष भागात महाराष्ट्राचे एक लाडके व्यक्तिमत्त्व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि त्यांच्या पत्नी हजेरी लावणार आहे
नुकतंच ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमातील दिवाळी विशेष भागाचा झी मराठीने एक प्रोमो शेअर केला होता. या प्रोमोत रवी जाधव आणि त्यांच्या पत्नी पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमातील विशेष भागात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि त्यांच्या पत्नी हजेरी लावत आहेत. रामदास आठवले व त्यांच्या पत्नी हे दोघेही खास पाहुणे असणार आहे. यावेळी आदेश बांदेकर हे आठवले कुटुंबासोबत आणि त्यांच्या ‘होम मिनिस्टर’सोबत गप्पा मारताना दिसणार आहेत.
या प्रोमोत रामदास आठवले हे त्यांच्या शैलीत कविता करताना दिसत आहेत. यावेळी आदेश बांदेकरांनी आठवलेंना त्यांच्या लग्नाची तारीख विचारली. त्यावेळी आठवलेंनी तारीख सांगतच एक मजेशीर उखाणा घेतला. “माझ्या लग्नाची तारीख आहे सोळा, म्हणून हिच्यावर होता माझा डोळा”, असा हटके उखाणा रामदास आठवले यांनी घेतला. त्यांचा हा मजेशीर उखाणा ऐकून बांदेकर भावोजींनाही हसू आवरले नाही.
दरम्यान कुटुंबियांसोबत रंगलेला होम मिनिस्टरचा हा विशेष भाग काल (शुक्रवारी) १२ प्रसारीत झाला असून आजही (शनिवारी) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे या दरम्यान कोणकोणत्या गमतीजमती होतात? आठवले त्यांच्या पत्नीला पैठणी मिळवून देण्यात यशस्वी ठरतात की नाही? हे पाहण्यासाठी प्रेक्षक मात्र उत्सुक दिसत आहेत.
from Parner Darshan https://ift.tt/3CdnlV8