
देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी ब्लॅक बॉक्स सापडला आहे. यामुळे या दुर्घटनेचं नेमकं कारण काय? ते समजणार आहे. चला, तर हा ब्लॅक बॉक्स असतो तरी काय? त्याचे फायदे काय? जाणून घेऊयात…
ब्लॅक बॉक्स म्हणजे एखाद्या विमान किंवा हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फ्लाईट डेटा रेकॉर्डर (एफडीआर) ज्यामध्ये आकडेवारी दिलेली असते तर आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर (सीव्हीआर) असते ज्याद्वारे संभाषण रेकॉर्ड केले जाते ते उपकरण.
या ब्लॅक बॉक्सचा रंग केशरी असतो. त्याची विशेष बाब म्हणजे त्याच्यावर आग आणि पाणी या कशाचाच परिणाम होत नाही. हा बॉक्स सुरक्षित रहावा याकरिता तो विमानाच्या मागील भागात बसवला जातो. या ब्लॅक बॉक्सच्या बॅटरीची क्षमता 30 दिवस एवढी असते. त्याच्या डेटाचा वापर अनेक वर्षांनंतरही केला जाऊ शकतो. दुर्घटनाग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळाल्यानंतर तो तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला जातो. यात रेकॉर्ड झालेल्या डेटाद्वारे दुर्घटनेच्या कारणांचा अंदाज लागतो.
मेलबर्नच्या वैमानिक संशोधन प्रयोगशाळेत काम करत असताना कमर्शिअल एअरक्राफ्ट अपघात झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे शास्त्रज्ञ डेव्हिड वॉरेन यांनी 1950च्या दशकात ब्लॅक बॉक्सचा शोध लावला होता. विमान दुर्घटना होण्याआधीच्या घडामोडी रेकॉर्ड करता येईल का? असा विचार करुन त्यांनी फ्लाईट डेटा रेकॉर्डरवर काम करायला सुरुवात केली आणि त्यानंतर ब्लॅक बॉक्सचा शोध लागला होता.
from https://ift.tt/338NVmh